Home
Bibles
Bible Study with Steffi
Parallel उत्पत्ति 41
Aa
Parallel उत्पत्ति
Chapter 41
मराठी बायबल · World English Bible
Change versions
Left Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Right Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Back to मराठी बायबल chapter
Back to World English Bible chapter
मराठी बायबल
World English Bible
1
दोन वर्षानंतर फारो राजाला स्वप्न पडले;ते असे की तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता.
1
It happened at the end of two full years, that Pharaoh dreamed: and, behold, he stood by the river.
2
तेव्हा त्याने सात गाई नाईल नदीतून बाहेर येताना पाहिल्या. त्या धुष्टपुष्ट व सुंदर होत्या. त्या तेथे उभ्या राहून गवत खात होत्या.
2
Behold, there came up out of the river seven cattle, well-favored and fat-fleshed, and they fed in the reed-grass.
3
त्यानंतर आणखी सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर आल्या व त्या सात धष्टपुष्ट व सुंदर गाईच्या बाजूला उभ्या राहिल्या.
3
Behold, seven other cattle came up after them out of the river, ill-favored and lean-fleshed, and stood by the other cattle on the brink of the river.
4
आणि त्या सात दुबळ्या व कुरुप गाईनी त्या सात सुंदर व धष्टपुष्ठ गाईना खाऊन टाकले. त्या नंतर फारो राजा जागा झाला.
4
The ill-favored and lean-fleshed cattle ate up the seven well-favored and fat cattle. So Pharaoh awoke.
5
मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्याला दुसऱ्यांदा स्वप्न पडले; त्यात त्याने पाहिले की एकाच ताटाला सात भरदार कणसे आली.
5
He slept and dreamed a second time: and, behold, seven heads of grain came up on one stalk, healthy and good.
6
त्या नंतर त्या ताटाला सात खुरटलेली व करपलेली अशी सात कणसे आली.
6
Behold, seven heads of grain, thin and blasted with the east wind, sprung up after them.
7
नंतर त्या सात खुरटलेल्या व करपलेल्या कणसांनी ती सात चांगली व टपोऱ्या दाण्यांची भरदार कणसे गिळून टाकली; तेव्हा फारो पुन्हा जागा झाला आणि ते तर स्वप्न असल्याचे त्याला समजले.
7
The thin heads of grain swallowed up the seven healthy and full ears. Pharaoh awoke, and, behold, it was a dream.
8
दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर फारो राजा त्या स्वप्नामुळे चिंतेत पडून बेचैन झाला व त्याने पंडितांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली; परंतु त्यांतील कोणालाच त्या स्वप्नांच अर्थ सांगता आला नाही किंवा त्याचा उलगडा करता आला नाही.
8
It happened in the morning that his spirit was troubled, and he sent and called for all the magicians of Egypt, and all the wise men of it. Pharaoh told them his dream, but there was no one who could interpret them to Pharaoh.
9
तेव्हा प्यालेबरदाराला योसेफाची आठवण आली. तो फारोस म्हणाला, “माझ्या बाबतीत जे घडले त्याची मला आठवण येत आहे;
9
Then the chief cupbearer spoke to Pharaoh, saying, "I remember my faults today.
10
आपण माझ्यावर व आचाऱ्यावर संतापला होता आणि आपण आम्हांस तुरुंगात टाकले होते.
10
Pharaoh was angry with his servants, and put me in custody in the house of the captain of the guard, me and the chief baker.
11
तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री आम्हा दोघांना स्वप्ने पडली. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगळा होता.
11
We dreamed a dream in one night, I and he. We dreamed each man according to the interpretation of his dream.
12
तेथे कोणी इब्री तरुण आमच्या बरोबर कैदेत होता. तो गारदद्यांच्या सरदाराचा दास होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्यांचे स्पष्टीकरण केले आणि त्याने आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व उलगडा केला.
12
There was with us there a young man, a Hebrew, servant to the captain of the guard, and we told him, and he interpreted to us our dreams. To each man according to his dream he interpreted.
13
1आणि त्याने सांगितलेला अर्थ खरा ठरला. तो म्हणाला की माझी सुटका होईल व मला पूर्वीप्रमाणे माझ्या कामावर पुन्हा घेतले जाईल आणि अगदी त्याप्रमाणे खरेच घडून आले; आणि तो म्हणाला की आचारी मरेल आणि त्याप्रमाणे तेही खरे झाले.”
13
It happened, as he interpreted to us, so it was: he restored me to my office, and he hanged him."
14
मग फारोने योसेफाला तुरुंगातून आणण्यास बोलावणे पाठवले. तेव्हा गारद्यांनी योसेफाल ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करुन व स्वच्छ कपडे बदलून फारोपुढे येऊन उभा राहिला.
14
Then Pharaoh sent and called Joseph, and they brought him hastily out of the dungeon. He shaved himself, changed his clothing, and came in to Pharaoh.
15
मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस.”
15
Pharaoh said to Joseph, "I have dreamed a dream, and there is no one who can interpret it. I have heard it said of you, that when you hear a dream you can interpret it."
16
योसेफ म्हणाला, “मी माझ्या कौशल्याने किंवा हुशारीने स्वप्नांचा अर्थ सांगतो असे नाही, तर केवळ देवालाच हे सामर्थ्थ आहे आणि तो देवच फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल.”
16
Joseph answered Pharaoh, saying, "It isn't in me. God will give Pharaoh an answer of peace."
17
मग फारो योसेफला म्हणाला, “स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो.
17
Pharaoh spoke to Joseph, "In my dream, behold, I stood on the brink of the river:
18
तेव्हा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले.
18
and, behold, there came up out of the river seven cattle, fat-fleshed and well-favored. They fed in the reed-grass,
19
त्यानंतर सात रोड व कुरुप गाई नदीतून बाहेर येताना मी पाहिल्या. त्यांच्या सारख्या दुबळ्या व कुरुप गाई मी सबंध मिसर देशात कधीच पाहिल्या नव्हत्या.
19
and, behold, seven other cattle came up after them, poor and very ill-favored and lean-fleshed, such as I never saw in all the land of Egypt for ugliness.
20
त्या रोड व कुरुप गाईनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या.
20
The lean and ill-favored cattle ate up the first seven fat cattle,
21
तरीही त्या रोड व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते; त्या पूर्वी इतक्याच अशक्त व रोड दिसत होत्या मग मी जागा झालो.
21
and when they had eaten them up, it couldn't be known that they had eaten them, but they were still ill-favored, as at the beginning. So I awoke.
22
“त्यानंतर दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली,
22
I saw in my dream, and, behold, seven heads of grain came up on one stalk, full and good:
23
मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी करपटलेली, कुरुप व गरम वाऱ्याच्या झळयामुळे करपलेली सात कणसे आली.
23
and, behold, seven heads of grain, withered, thin, and blasted with the east wind, sprung up after them.
24
व त्यांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली.“ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना, ज्योतिष्यांना व पंडितांना सांगितली; परंतु त्यांचा अर्थ कोणालाही सांगता आला नाही; तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे?”
24
The thin heads of grain swallowed up the seven good heads of grain. I told it to the magicians; but there was no one who could explain it to me."
25
मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, ह्या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकसारखाच आहे; लवकरच काय होणार आहे हे देव आपणास सांगत आहे;
25
Joseph said to Pharaoh, "The dream of Pharaoh is one. What God is about to do he has declared to Pharaoh.
26
त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे. दोन्हीही स्वप्ने सारखीच आहेत;
26
The seven good cattle are seven years; and the seven good heads of grain are seven years. The dream is one.
27
त्या दुसऱ्या सात रोड गाई व ती सात रोड कणसे म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे. ती सात वर्षे चांगल्या सात वर्षानंतर येतील.
27
The seven lean and ill-favored cattle that came up after them are seven years, and also the seven empty heads of grain blasted with the east wind; they will be seven years of famine.
28
लवकरच काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. मी संगितल्याप्रमाणेच हे घडून येईल.
28
That is the thing which I spoke to Pharaoh. What God is about to do he has shown to Pharaoh.
29
सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल व मिसर देशभर भरपूर खावयास असेल.
29
Behold, there come seven years of great plenty throughout all the land of Egypt.
30
परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की त्यामुळे मिसर देशभर पिकलेले धान्य विसरले जाईल; आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील.
30
There will arise after them seven years of famine, and all the plenty will be forgotten in the land of Egypt. The famine will consume the land,
31
आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस कसे होते याचा लोकांना विसर पडेल.
31
and the plenty will not be known in the land by reason of that famine which follows; for it will be very grievous.
32
“तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोन स्वप्ने पडली ते यासाठी की देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील, हे आपणास दाखवावे.
32
The dream was doubled to Pharaoh, because the thing is established by God, and God will shortly bring it to pass.
33
तेव्हा, फारो महाराज, आपण एखाद्या चतुर व शहाण्या पुरुषाची निवड करुन त्याला सर्व मिसर देशावर प्रशासक म्हणून नेमावे;
33
Now therefore let Pharaoh look for a discreet and wise man, and set him over the land of Egypt.
34
त्या नंतर शेतकऱ्याकडून धान्य गोळा करण्यासाठी इतर अधिकारी निवडावेत; येत्या सात वर्षांच्या सुकाळात प्रत्येकाने आपल्या धान्याच्या उत्पन्नाचा पांचवा हिस्सा सरकारला द्यावा.
34
Let Pharaoh do this, and let him appoint overseers over the land, and take up the fifth part of the land of Egypt's produce in the seven plenteous years.
35
अशा रीतीने ही माणसे सुकाळाच्या सात वर्षात पुष्कळ अन्न गोळा करतील आणि गरज पडेपर्यंत नगरात साठवून ठेवतील अशा प्रकारे, फारो, हे अन्न तुझ्या नियंत्रणात राहील.
35
Let them gather all the food of these good years that come, and lay up grain under the hand of Pharaoh for food in the cities, and let them keep it.
36
येणाऱ्या दुष्काळातील सात वर्षांच्या काळात त्या धान्याचा उपयोग होईल. तेव्हा मग दुष्काळाच्या सात वर्षात मिसराच नाश होणार नाही.”
36
The food will be for a store to the land against the seven years of famine, which will be in the land of Egypt; that the land not perish through the famine."
37
फारो राजाला ही कल्पना फार चांगली वाटली व पटली; तसेच त्याच्या सर्व सेवकांनी एकमताने तिला संमती दिली.
37
The thing was good in the eyes of Pharaoh, and in the eyes of all his servants.
38
फारोने म्हटले, “योसेफापेक्षा अधिक चांगला व योग्य, दुसरा कोणी पुरुष सापडेल काय? देवाचा आत्मा त्याच्यात असल्यामुळे त्याला शहाणपण येते!”
38
Pharaoh said to his servants, "Can we find such a one as this, a man in whom is the Spirit of God?"
39
तेव्हा फारो योसेफास म्हणाला, “देवाने तुला या सर्व गोष्टी दाखवल्या आहेत, म्हणून तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही.
39
Pharaoh said to Joseph, "Because God has shown you all of this, there is none so discreet and wise as you.
40
म्हणून मी तुला या देशाचा (मिसरचा) अधिपती म्हणजे सर्वात उच्च अधिकारी म्हणून नेमतो. सर्व लोक तुझ्या सर्व आज्ञा पाळितील; या देशात केवळ राजासना पुरता म्हणजे नामधारी राजा म्हणून काय तो मी एक तुझ्यापेक्षा मोठा असेन.”
40
You shall be over my house, and according to your word will all my people be ruled. Only in the throne I will be greater than you."
41
मग फारो योसेफास म्हणाला, “मी तुला आता अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणून नेमितो.”
41
Pharaoh said to Joseph, "Behold, I have set you over all the land of Egypt."
42
मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्याला घातला आणि त्याच्या गाळ्यात एक सोन्याची साखळी घातली.
42
Pharaoh took off his signet ring from his hand, and put it on Joseph's hand, and arrayed him in robes of fine linen, and put a gold chain about his neck,
43
नंतर फारोने योसेफाला संचलनातील दुसऱ्या रथात बसण्यास सांगितले; खास नेमलेले गारदी पुढे चालले होते; ते ललकारून जाहीरपणे सांगत होते, “लोक हो! आपल्या देशाच्या प्रशासक योसेफ, याला लवून मुजरा करा.”अशी रीतीने योसेफाला मिसर देशाचा प्रशासक (प्रमुख अधिकारी) नेमले.
43
and he made him to ride in the second chariot which he had. They cried before him, "Bow the knee!" He set him over all the land of Egypt.
44
फारो योसेफाला म्हणाला, “मी मिसराचा राजा आहे खरा, परंतु तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाहीं.”
44
Pharaoh said to Joseph, "I am Pharaoh, and without you shall no man lift up his hand or his foot in all the land of Egypt."
45
फारोने योसेफाला सापनाथ-पानेह असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पेटीफरा याची मुलगी आसनथ ही योसेफाला बायको करुन दिली. अशा रीतीने योसेफ सर्व मिसर देशावर प्रशासक झाला.
45
Pharaoh called Joseph's name Zaphenath-paneah; and he gave him Asenath, the daughter of Potiphera priest of On as a wife. Joseph went out over the land of Egypt.
46
योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करु लागला तेव्हा तो अवघा तीस वर्षांचा होता; योसेफाने मिसर देशभर दौरा करुन देशाची पाहणी केली.
46
Joseph was thirty years old when he stood before Pharaoh king of Egypt. Joseph went out from the presence of Pharaoh, and went throughout all the land of Egypt.
47
सुकाळाच्या सात वर्षात सर्व देशभर भरपूर पीक आले.
47
In the seven plenteous years the earth brought forth abundantly.
48
योसेफाने सुकाळाच्या सात वर्षात अन्न गोळा करुन त्या त्या शेतातले धान्य जवळच्याच नगरोनगरी साठवून ठेवले.
48
He gathered up all the food of the seven years which were in the land of Egypt, and laid up the food in the cities: the food of the field, which was round about every city, he laid up in the same.
49
योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळू इतके धान्य गोळा करुन साठवून ठेवले; ते इतके होते की त्याचे मोजमाप करता येत नव्हते.
49
Joseph laid up grain as the sand of the sea, very much, until he stopped counting, for it was without number.
50
योसेफाची बायको ही ओन नगराचा याजक पोटीफरा याची मुलगी होती. दुष्काळाच्या सात वर्षांपैकी पहिले वर्ष येण्याअगोदर योसेफ व आसनथ यांना दोन मुलगे झाले.
50
To Joseph were born two sons before the year of famine came, whom Asenath, the daughter of Potiphera priest of On, bore to him.
51
पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे होते; योसेफाने त्याला हे नांव दिले कारण तो म्हणाला, “देवाने मला झालेला त्रास व माझ्यावर झालेला अन्याय, तसेच माझ्या घराकडील सर्व काही यांचा मला विसर पडू दिला.”
51
Joseph called the name of the firstborn Manasseh, "For," he said, "God has made me forget all my toil, and all my father's house."
52
योसेफाने दुसऱ्या मुलाचे नाव एफ्राईम असे ठेवले कारण तो म्हणाला, “माझ्यावर संकटे आली परंतु देवाने मला सर्वबाबतीत सफल केले.”
52
The name of the second, he called Ephraim: "For God has made me fruitful in the land of my affliction."
53
सात वर्षापर्यंत मिसरमध्ये भरपूर अन्न होते पण ती वर्षे संपली.
53
The seven years of plenty, that was in the land of Egypt, came to an end.
54
परंतु सात वर्षानंतर अगदी योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली; तेव्हा कोणत्याच देशात कोठेही कसलेच पीक आले नाही; आणि लोकांना खावयास धान्य मिळेना; परंतु मिसरमध्ये मात्र योसेफाने धान्य साठवल्यामुळे लोकांपाशी खावयास भरपूर अन्न होते.
54
The seven years of famine began to come, just as Joseph had said. There was famine in all lands, but in all the land of Egypt there was bread.
55
दुष्काळ पडण्यास सुरुवात झाली, तेव्हा लोकांनी धान्यासाठी फारोकडे ओरड केली; तेव्हा फारो मिसरच्या लोकांना म्हणाला, “योसेफाला विचारा व तो सांगले ते करा.”
55
When all the land of Egypt was famished, the people cried to Pharaoh for bread, and Pharaoh said to all the Egyptians, "Go to Joseph. What he says to you, do."
56
तेव्हा चोहीकडे दुष्काळ पडल्यावर योसेफाने मिसरच्या लोकांना धान्य भांडारातून धान्य विकत दिले. मिसरमध्ये फार वाईट प्रकारचा दुष्काळ पडला होत.
56
The famine was over all the surface of the earth. Joseph opened all the store-houses, and sold to the Egyptians. The famine was severe in the land of Egypt.
57
मिसरच्या सभोवतालच्या देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी योसेफाकडे येऊ लागले कारण त्यावेळी जगाच्या त्या भागात दुष्काळ पडला होता.
57
All countries came into Egypt, to Joseph, to buy grain, because the famine was severe in all the earth.
Choose Theme