Home
Bibles
Bible Study with Steffi
Parallel निर्गम 1
Aa
Parallel निर्गम
Chapter 1
मराठी बायबल · World English Bible
Change versions
Left Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Right Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Back to मराठी बायबल chapter
Back to World English Bible chapter
मराठी बायबल
World English Bible
1
याकोब (इस्राएल) आपली मुले व त्यांची कुटुंबे यांच्या बरोबर मिसरला गेला, इस्राएलाची मिसरला गेलेली मुले ही:
1
Now these are the names of the sons of Israel, who came into Egypt (every man and his household came with Jacob):
2
रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा
2
Reuben, Simeon, Levi, and Judah,
3
इस्साखार, जबुलून, बन्यामीन;
3
Issachar, Zebulun, and Benjamin,
4
दान, नफताली, गाद व आशेर.
4
Dan and Naphtali, Gad and Asher.
5
त्याच्या वंशाचे हे एकूण सत्तरजण होते. (त्याच्या बारा मुलांपैकी योसेफ हा अगोदरच मिसरमध्ये होता.)
5
All the souls who came out of the Jacob's body were seventy souls, and Joseph was in Egypt already.
6
काही काळानंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व लोक मरण पावले.
6
Joseph died, as did all his brothers, and all that generation.
7
परंतु इस्राएल लोकांना पुष्कळ मुले झाली आणि त्यांची संख्या वाढत गेली; ते लोक महाप्रबल झाले आणि सर्व मिसर देश त्यांनी भरून गेला.
7
The children of Israel were fruitful, and increased abundantly, and multiplied, and grew exceedingly mighty; and the land was filled with them.
8
नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करु लागला. योसेफ व त्याची कर्तबगारी याची त्याला माहीती नव्हती.
8
Now there arose a new king over Egypt, who didn't know Joseph.
9
तो आपल्या लोकांना म्हणाला, “ह्या इस्राएल लोकांकडे पाहा; देशात ते फार झाले आहेत! आणि ते आपल्यापेक्षा संख्येने अधिक आहेत व शक्तीमानही झाले आहेत;
9
He said to his people, "Behold, the people of the children of Israel are more and mightier than we.
10
त्यांची वाढ थांबवावी म्हणून आपण काहीतरी उपाय योजना केलीच पाहिजे. जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे इस्राएल लोक आपल्या शत्रुला जाऊन मिळतील; आणि मग ते आपला पराभव करुन आपणापासून निसटून जातील.”
10
Come, let us deal wisely with them, lest they multiply, and it happen that when any war breaks out, they also join themselves to our enemies, and fight against us, and escape out of the land."
11
तेव्हा इस्राएल लोकांस त्रास देऊन त्यांचे जीवन कष्टमय व कठीण करावयाचे असे मिसरच्या लोकांनी ठरविले, म्हणून त्यांनी, गुलामाकडून बिगार कामे करुन घेण्यासाठी जसे मुकादम नेमतात तसे इस्राएल लोकावंर मुकादम नेमले. त्या मुकादमांनी राजाकरिता पिथोम व रामसेस ही दोन शहरे जबरदस्तीने इस्राएल लोकांकडून बांधून घेतली; राजाने या दोन शहरांचा धान्य व इतर वस्तु साठवून ठेवण्यासाठी उपयोग केला.
11
Therefore they set taskmasters over them to afflict them with their burdens. They built storage cities for Pharaoh: Pithom and Raamses.
12
मिसरवासीयांनी इस्राएल लोकावंर अधिक कठीण व कष्टाची कामे लादली; परंतु जसजसे ते त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादू लागले तसतसे इस्राएल लोक अधिकच संख्येने वाढत गेले व अधिकच पसरले;
12
But the more they afflicted them, the more they multiplied and the more they spread out. They were grieved because of the children of Israel.
13
आणि मग मिसरवासीयांना त्यांची अधिकच भीती वाटू लागली; म्हणून त्यांनी त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादली.
13
The Egyptians ruthlessly made the children of Israel serve,
14
अशा प्रकारे मिसरवासीयांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केलें; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, घाण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीन व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
14
and they made their lives bitter with hard service, in mortar and in brick, and in all manner of service in the field, all their service, in which they ruthlessly made them serve.
15
इस्राएली स्त्रिया बाळंत होताना त्यांना मदत करणाऱ्या शिप्रा व पुवा नावांच्या दोन इब्री म्हणजे इस्राएली सुइणी होत्या. मिसरच्या राजाने त्यांना आज्ञा केली.
15
The king of Egypt spoke to the Hebrew midwives, of whom the name of the one was Shiphrah, and the name of the other Puah,
16
तो म्हणला, “तुम्ही इब्री स्त्रियांना बाळंतपणात सहाय्य करण्याचे काम चालू ठेवा. त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्याला अवश्य मारून टाका.”
16
and he said, "When you perform the duty of a midwife to the Hebrew women, and see them on the birth stool; if it is a son, then you shall kill him; but if it is a daughter, then she shall live."
17
परंतु त्या सुइणा देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या म्हणून त्यांनी राजाची आज्ञा मानली नाही; त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले.
17
But the midwives feared God, and didn't do what the king of Egypt commanded them, but saved the baby boys alive.
18
तेव्हा मिसरच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?”
18
The king of Egypt called for the midwives, and said to them, "Why have you done this thing, and have saved the men-children alive?"
19
सुइणी म्हणल्या, “ह्या इब्री म्हणजे इस्राएली स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहोंचाण्यापूर्वीच त्या बाळंत होतात.”
19
The midwives said to Pharaoh, "Because the Hebrew women aren't like the Egyptian women; for they are vigorous, and give birth before the midwife comes to them."
20
त्या सुइणींच्या कामाबद्दल देवाला आनंद झाला; त्याबद्दल देवाने त्यांचे कल्याण केले वे त्यांची घराणी स्थापित केली;
20
God dealt well with the midwives, and the people multiplied, and grew very mighty.
21
इस्राएल लोकांना अधिक मुले होत राहिली; ते संख्येने फार वाढले व फार बलवान झाले.
21
It happened, because the midwives feared God, that he gave them families.
22
तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांना आज्ञा दिली, “त्या लोकापैकी ज्यांना मुलगा होईल तो प्रत्येक मुलगा नाईल नदीत फेकून द्या पण मुलगी मात्र जिवंत ठेवा
22
Pharaoh charged all his people, saying, "You shall cast every son who is born into the river, and every daughter you shall save alive."
Choose Theme