Home
Bibles
Bible Study with Steffi
Parallel 2 राजे 15
Aa
Parallel 2 राजे
Chapter 15
मराठी बायबल · World English Bible
Change versions
Left Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Right Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Back to मराठी बायबल chapter
Back to World English Bible chapter
मराठी बायबल
World English Bible
1
इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राजा झाला.
1
In the twenty-seventh year of Jeroboam king of Israel began Azariah son of Amaziah king of Judah to reign.
2
तेव्हा अजऱ्या सोळा वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये बावन्र वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या ती यरुशलेममधली होती.
2
Sixteen years old was he when he began to reign; and he reigned fifty-two years in Jerusalem: and his mother's name was Jecoliah of Jerusalem.
3
अजऱ्याचे वर्तन आपल्या वडीलांप्रमाणेच परमेश्वराने सांगितले तसे उचित होते. आपले वडील अमस्या जसे वागले तसाच हाही वागला.
3
He did that which was right in the eyes of Yahweh, according to all that his father Amaziah had done.
4
परंतु उंचस्थानावरील पूजास्थळे त्याने नष्ट केली नाहीत. त्या ठिकाणी लोक यज्ञ करीत तसेच धूप जाळीत.
4
However the high places were not taken away: the people still sacrificed and burnt incense in the high places.
5
परमेश्वराच्या अवकृपेने राजा अजऱ्या याला कुष्ठरोग झाला. मरेपर्यंत तो त्यातून बरा झाला नाही. तेव्हा तो वेगळा राहू लागला. त्याचा मुलगा योथाम याने राजाच्या या घराची देखभाल केली आणि तोच लोकांचा न्यायनिवाडा करु लागला.
5
Yahweh struck the king, so that he was a leper to the day of his death, and lived in a separate house. Jotham the king's son was over the household, judging the people of the land.
6
अजऱ्याने जे केले ते सर्व ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहून ठेवलेले आहे.
6
Now the rest of the acts of Azariah, and all that he did, aren't they written in the book of the chronicles of the kings of Judah?
7
अजऱ्याचे निधन झाले. दावीदनगरात त्याचे पूर्वजांशेजारी दफन झाले. त्याचा मुलगा योथाम त्याच्यानंतर राज्यावर आला.
7
Azariah slept with his fathers; and they buried him with his fathers in the city of David: and Jotham his son reigned in his place.
8
यराबामचा मुलगा जखऱ्या याने इस्राएलवर शोमरोनमध्ये सहा महिने राज्य केले. यहूदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीचे तेव्हा अडतिसावे वर्ष होते.
8
In the thirty-eighth year of Azariah king of Judah did Zechariah the son of Jeroboam reign over Israel in Samaria six months.
9
जखऱ्याने परमेश्वराच्या दृष्टीने निषिध्द अशी कृत्ये केली. याबाबतीत तो आपल्या पूर्वजांप्रमाणेच वागला. नबाटचा मुलगा यराबाम याने इस्राएलला जी पापे करायला लावली तीच याने केली.
9
He did that which was evil in the sight of Yahweh, as his fathers had done: he didn't depart from the sins of Jeroboam the son of Nebat, with which he made Israel to sin.
10
मग याबेशचा मुलगा शल्लूम याने जखऱ्याविरुध्द कट केला. इब्लाममध्ये त्याने जखऱ्याला ठार केले. आणि स्वत: राज्यावर आला.
10
Shallum the son of Jabesh conspired against him, and struck him before the people, and killed him, and reigned in his place.
11
जखऱ्याने ज्या काही इतर गोष्टी केल्या त्या ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
11
Now the rest of the acts of Zechariah, behold, they are written in the book of the chronicles of the kings of Israel.
12
अशा रीतीने परमेश्वराचा शब्द खरा ठरला. येहूच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील असे परमेश्वराने येहूला सांगितले होते.
12
This was the word of Yahweh which he spoke to Jehu, saying, Your sons to the fourth generation shall sit on the throne of Israel. So it came to pass.
13
याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा उज्जीया यहूदाचा राजा झाल्याला एकोणचाळिसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.
13
Shallum the son of Jabesh began to reign in the nine and thirtieth year of Uzziah king of Judah; and he reigned the space of a month in Samaria.
14
गादीचा मुलगा मनहेम तिरसाहून शोमरोनमध्ये आला त्याने शल्लूमला ठार केले. मग मनहेम स्वत: राजा झाला.
14
Menahem the son of Gadi went up from Tirzah, and came to Samaria, and struck Shallum the son of Jabesh in Samaria, and killed him, and reigned in his place.
15
शल्लूमने जे केले ते सगळे, तसेच त्याने जखऱ्याविरुध्द केलेला कट ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात लिहिलेले आहे.
15
Now the rest of the acts of Shallum, and his conspiracy which he made, behold, they are written in the book of the chronicles of the kings of Israel.
16
शल्लूमच्या मृत्यूनंतर मनहेमने तिफसाहचा तसेच त्याच्या भोवतालच्या प्रदेशाचा पाडाव केला. लोकांनी नगराची वेस उघाडायला विरोध केला तेव्हा त्यांनाही नेस्तनाबुत करुन त्याने गर्भवती स्त्रियांनाही कापून काढले.
16
Then Menahem struck Tiphsah, and all who were therein, and the borders of it, from Tirzah: because they didn't open to him, therefore he struck it; and all the women therein who were with child he ripped up.
17
यहूदाचा राजा अजऱ्या याच्या एकोणचाळिसाव्या वर्षात गादीचा मुलगा मनहेम इस्राएलवर राज्य करु लागला. मनहेमने शोमरोनमध्ये दहा वर्षे राज्य केले.
17
In the nine and thirtieth year of Azariah king of Judah began Menahem the son of Gadi to reign over Israel, and reigned ten years in Samaria.
18
मनहेमने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचा अध:पात झाला तीच पापे मनहेमने केली.
18
He did that which was evil in the sight of Yahweh: he didn't depart all his days from the sins of Jeroboam the son of Nebat, with which he made Israel to sin.
19
अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली.
19
There came against the land Pul the king of Assyria; and Menahem gave Pul one thousand talents of silver, that his hand might be with him to confirm the kingdom in his hand.
20
हा पैसा उभा करायला मनहेमने श्रीमंत आणि वजनदार लोकांवर कर बसवला. प्रत्येकाला त्याने वीस औंस चांदी करद्यापाने द्यायला लावली. मग ही रक्कम त्याने अश्शूरच्या राजाला दिली. तेव्हा अश्शूरचा राजा परत फिरला. इस्राएलमध्ये तो राहिला नाही.
20
Menahem exacted the money of Israel, even of all the mighty men of wealth, of each man fifty shekels of silver, to give to the king of Assyria. So the king of Assyria turned back, and didn't stay there in the land.
21
मनहेमच्या पराक्रमांची नोंद ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
21
Now the rest of the acts of Menahem, and all that he did, aren't they written in the book of the chronicles of the kings of Israel?
22
मनहेम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा पेकह्या नवीन राजा झाला.
22
Menahem slept with his fathers; and Pekahiah his son reigned in his place.
23
अजऱ्याच्या यहूदावरील राज्याच्या पन्नासाव्या वर्षी मनहेमचा मुलगा पेकह्या शोमरोन मधून इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने दोन वर्षे राज्य केले.
23
In the fiftieth year of Azariah king of Judah Pekahiah the son of Menahem began to reign over Israel in Samaria, and reigned two years.
24
परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते पेकह्याने केले. नबाटचा मुलगा यराबाम याच्या ज्या पापांमुळे इस्राएलचे अध:पतन झाले तीच पापे पेकह्याने केली.
24
He did that which was evil in the sight of Yahweh: he didn't depart from the sins of Jeroboam the son of Nebat, with which he made Israel to sin.
25
रमाल्या याचा मुलगा पेकह हा पेकह्याच्या सैन्याचा सरदार होता. पेकहने पेकह्याला मारले. शोमरोन मध्ये राजवाड्यातच त्याने हा वध केला. वधाच्या वेळी पेकह बरोबर गिलादमधली पन्नास माणसे होती. यानंतर पेकह राजा झाला.
25
Pekah the son of Remaliah, his captain, conspired against him, and struck him in Samaria, in the castle of the king's house, with Argob and Arieh; and with him were fifty men of the Gileadites: and he killed him, and reigned in his place.
26
पेकह्याच्या सर्व पराक्रमांची नोंद ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
26
Now the rest of the acts of Pekahiah, and all that he did, behold, they are written in the book of the chronicles of the kings of Israel.
27
रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलवर राज्य करु लागला तेव्हा यहूदाचा राजा अजऱ्या याचे बावन्नावे वर्ष होते. पेकहाने वीस वर्षे राज्य केले. पेकहाची कारकीर्द
27
In the two and fiftieth year of Azariah king of Judah Pekah the son of Remaliah began to reign over Israel in Samaria, and reigned twenty years.
28
पेकहाने परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये केली. नबाटचा मुलगा यारबाम याच्या पापांनी इस्राएलचा अध:पात झाला. पेकह त्याच मार्गाने गेला.
28
He did that which was evil in the sight of Yahweh: he didn't depart from the sins of Jeroboam the son of Nebat, with which he made Israel to sin.
29
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.
29
In the days of Pekah king of Israel came Tiglath Pileser king of Assyria, and took Ijon, and Abel Beth Maacah, and Janoah, and Kedesh, and Hazor, and Gilead, and Galilee, all the land of Naphtali; and he carried them captive to Assyria.
30
एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी हे झाले.
30
Hoshea the son of Elah made a conspiracy against Pekah the son of Remaliah, and struck him, and killed him, and reigned in his place, in the twentieth year of Jotham the son of Uzziah.
31
पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.
31
Now the rest of the acts of Pekah, and all that he did, behold, they are written in the book of the chronicles of the kings of Israel.
32
उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला तेव्हा रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर दुसरे वर्ष चालू होते.
32
In the second year of Pekah the son of Remaliah king of Israel began Jotham the son of Uzziah king of Judah to reign.
33
योथाम तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेममध्ये सोळा वर्षे राज्य केले. सादोकची मुलगी यरुशा ही त्याची आई.
33
He was twenty-five years old when he began to reign; and he reigned sixteen years in Jerusalem: and his mother's name was Jerusha the daughter of Zadok.
34
आपले वडील उज्जीया यांच्या प्रमाणेच योथामही परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कृत्ये करत होता.
34
He did that which was right in the eyes of Yahweh; he did according to all that his father Uzziah had done.
35
पण त्यानेही उंचस्थानावरील पूजास्थळे नष्ट केली नाहीत. लोक तेथे यज्ञ करत, धूप जाळत. परमेश्वराच्या मंदिराला योथामने एक वरचा दरवाजा बांधला.
35
However the high places were not taken away: the people still sacrificed and burned incense in the high places. He built the upper gate of the house of Yahweh.
36
“यहूदांच्या राजाचा इतिहास’ या पुस्तकात योथामने केलेल्या पराक्रमांची नोंद आहे.
36
Now the rest of the acts of Jotham, and all that he did, aren't they written in the book of the chronicles of the kings of Judah?
37
अरामचा राजा रसीन आणि रमाल्याचा मुलगा पेकह यांना याच वेळी परमेश्वराने यहूदावर चालून जायला उद्यक्त केले.
37
In those days Yahweh began to send against Judah Rezin the king of Syria, and Pekah the son of Remaliah.
38
योथाम मरण पावला आणि आपल्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. दावीद नगर या आपल्या पूर्वजांच्या नगरात त्याला पुरले. त्याच्या नंतर त्याचा मुलगा आहाज नवा राजा झाला.
38
Jotham slept with his fathers, and was buried with his fathers in the city of David his father: and Ahaz his son reigned in his place.
Choose Theme