Home
Bibles
Bible Study with Steffi
Parallel 2 इतिहास 19
Aa
Parallel 2 इतिहास
Chapter 19
मराठी बायबल · World English Bible
Change versions
Left Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Right Bible
Bible in Basic English
King James Version
New King James Version
World English Bible
Young's Literal Translation
বাংলা বাইবেল
ગુજરાતી બાઇબલ
हिन्दी बाइबिल
ಕನ್ನಡ ಬೈಬಲ್
മലയാളം ബൈബിൾ
मराठी बायबल
नेपाली बाइबल
ଓଡ଼ିଆ ବାଇବେଲ
தமிழ் பரிசுத்த வேதாகமம்
తెలుగు బైబిల్
Back to मराठी बायबल chapter
Back to World English Bible chapter
मराठी बायबल
World English Bible
1
यहूदाचा राजा यहोशाफाट यरुशलेममध्ये आपल्या घरी सुखरुप परतला.
1
Jehoshaphat the king of Judah returned to his house in peace to Jerusalem.
2
हनानीचा मुलगा येहू हा द्रष्टा होता. तो यहोशाफाटला सामोरा गेला. येहू यहोशाफाटला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे.
2
Jehu the son of Hanani the seer went out to meet him, and said to king Jehoshaphat, Should you help the wicked, and love those who hate Yahweh? for this thing wrath is on you from before Yahweh.
3
पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वराला अनुसरायचे तू मन:पूर्वक ठरवले आहेस.”
3
Nevertheless there are good things found in you, in that you have put away the Asheroth out of the land, and have set your heart to seek God.
4
यहोशाफाट यरुशलेममध्ये राहात असे, त्याने पुन्हा एकदा बैर - शेब्यापासून एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत फिरुन लोकांच्या भेटी घेतल्या. त्याने लोकांना पुन्हा एकदा त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याकडे वळवले.
4
Jehoshaphat lived at Jerusalem: and he went out again among the people from Beersheba to the hill-country of Ephraim, and brought them back to Yahweh, the God of their fathers.
5
तसेच त्याने यहूदामध्ये आणि यहूदाच्या प्रत्येक तटबंदीच्या नगरांत न्यायाधीश नेमले.
5
He set judges in the land throughout all the fortified cities of Judah, city by city,
6
यहोशाफाटने या न्यायाधीशांना सांगितले, “तुम्ही जे करायचे ते विचारपूर्वक करा. कारण लोकांसाठी नव्हे तर परमेश्वरासाठी तुम्ही न्याय करत आहात. तुमच्या निर्णयाला त्याची साथ असेल.
6
and said to the judges, Consider what you do: for you don't judge for man, but for Yahweh; and he is with you in the judgment.
7
तुम्ही सर्वांनी परमेश्वराचे भय बाळगावे. तुम्ही जे काही कराल ते सांभाळून काळजीपूर्वक करा कारण आपला परमेश्वर देव न्यायी आहे. लोकांच्या बाबतीत तो पक्षपाती नाही.’ आणि लाच घेऊन न्याय फिरवणे हे ही त्याच्या नीतीत बसत नाही.”
7
Now therefore let the fear of Yahweh be on you; take heed and do it: for there is no iniquity with Yahweh our God, nor respect of persons, nor taking of bribes.
8
यानंतर यहोशाफाटाने यरुशलेममध्ये काही परमेश्वराचे लेवी, याजक तसेच इस्राएल घराण्यांतील वडीलधारी मंडळी यांना न्यायाधीश म्हणून नेमले. परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन त्यांनी यरुशलेममधल्या रहिवाश्यांच्या वादांचा निकाल लावायचा होता.
8
Moreover in Jerusalem did Jehoshaphat set of the Levites and the priests, and of the heads of the fathers' houses of Israel, for the judgment of Yahweh, and for controversies. They returned to Jerusalem.
9
यहोशाफाटने त्यांना आज्ञापूर्वक सांगितले की, “परमेश्वराचे भय धरुन निश्वसनीय रितीने आणि मन:पूर्वक ही सेवा करा.
9
He charged them, saying, Thus shall you do in the fear of Yahweh, faithfully, and with a perfect heart.
10
वध, कायदा, नियम, आज्ञा, किंवा एखादा न्याय यासंबंधी तुमच्याकडे वाद येतील. हे वाद नगरात राहणाऱ्या तुमच्या बांधवांकडूनच उपस्थित केले जातील. अशा सर्व बाबतीत प्रत्येक वेळी लोकांना सांगा की त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप करु नये. हे तुम्ही निष्ठेने पार पाडले नाहीत तर तुमच्यावर आणि या तुमच्या भाऊबंदांवर परमेश्वराचा कोप ओढवेल. एवढे करा म्हणजे तुमच्या मनात अपराधभाव राहणार नाही.
10
Whenever any controversy shall come to you from your brothers who dwell in their cities, between blood and blood, between law and commandment, statutes and ordinances, you shall warn them, that they not be guilty towards Yahweh, and so wrath come on you and on your brothers: this do, and you shall not be guilty.
11
अमऱ्या हा मुख्य याजक आहे. परमेश्वराच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींमध्ये त्याचे वर्चस्व राहील आणि इश्माएलचा मुलगा जबद्या, राजाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टीविषयी मुखत्यार म्हणून नेमलेला आहे. जबद्या हा यहूदा वंशाचा अधिकारी आहे. लेवी हे लेखनिक कारभारी म्हणून तुमच्या दिमतीला आहेत. जे जे कराल ते धैर्याने करा. उचित तेच करणाऱ्यांना परमेश्वराची साथ असो.”
11
Behold, Amariah the chief priest is over you in all matters of Yahweh; and Zebadiah the son of Ishmael, the ruler of the house of Judah, in all the king's matters: also the Levites shall be officers before you. Deal courageously, and Yahweh be with the good.
Choose Theme