पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सर्व शक्तिमान परमेश्वराच्या शोधात आणि त्याची उपासना करण्यासाठी यरुशलेमला येतील.
Cross references
त्या “प्राण्यानी” तुला हवे ते करावे म्हणून तू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलांना” आणि “गायींना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव. तू त्या देशांचा युध्दात पराभव केला आहेस आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग.
सध्या बुरख्याने सर्व राष्ट्रे आणि लोक झाकून गेले आहेत. हा बुरखा म्हणजेच “मृत्यू” होय.
आता, काही राष्ट्रे कोठे आहेत हे तुम्हाला माहीत नाही. पण त्यांची आणि तुमची भेट होईल. त्या राष्ट्रांना, तुम्ही माहीत नाही. पण ती राष्ट्रे तुमच्याकडे धाव घेतील. परमेश्वराची, तुमच्या देवाची इच्छा असल्यामुळे हे असे घडून येईल. इस्राएलचा पवित्र देव तुमचा आदर करीत असल्याने हे असे होईल.
राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे (देवाकडे) येतील. राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील.
प्रत्येक पूजेच्या दिवशी, सर्व लोक माझी उपासना करण्यासाठी येतील. ते प्रत्येक शब्बाथला आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी येतील.
तू ह्या गोष्टी केल्यास, तर तू शपथ घेण्यासाठी माझे नाव वापरु शकशील. ‘परमेश्वर असे तो पर्यंत,’ असे तू म्हणू शकशील. तू हे शब्द खऱ्या, प्रमाणिक आणि योग्य, तऱ्हेने वापरु शकशील. तू ह्या गोष्टी केल्यास परमेश्वर राष्ट्रांना आशीर्वाद देईल. ती राष्ट्रे परमेश्वराने केलेल्या कृत्यांबद्दल बढाया मारतील.”
तेथे पुष्कळ देशातले लोक जातील. ते म्हणतील, “या! आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ या. याकोबच्या देवाच्या मंदिरात आपण जाऊ या. मग परमेश्वर आपल्याला त्याचा आचारधर्म शिकवील व आपण त्याचे अनुसरण करु.” परमेश्वराच्या शिकवणुकीचा आणि परमेश्वराच्या संदेशाचा प्रारंभ यरुशलेममधून सियोन पर्वतावरुन होईल. मग तो सर्व जगात पसरेल.
तेव्हा सर्व राष्ट्रांतील लोकांचा परमेश्वर न्यायाधीश असेल. दूरच्या देशातील पुष्कळ लोकांमधील वाद परमेश्वर मिटवील. ते लोक लढण्यासाठी शस्त्रे वापरण्याचे सोडून देतील. ते त्यांच्या तलवारीपासून नांगर बनवतील आणि भाल्यांचा उपयोग झाडे छाटण्यासाठी करतील. लोक एकमेकांशी लढाई करणार नाहीत. लोकांना कधीही युध्दाचे शिक्षा दिले जाणार नाही.
मी राष्ट्रांना धक्का देईन आणि मग प्रत्येक राष्ट्र तुमच्याकडे संपत्ती घेऊन येईल मग हे मंदिर वैभवाने भरुन टाकीन. सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे.
निरनिराळ्या गावातील लोक एकमेकांना भेटतील. ते म्हणतील, ‘आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यास जात आहोत.’ आणि इतरलोक म्हणतील, ‘आम्हालासुध्दा यावेसे वाटते.”‘
यरुशलेमशी लढण्यास आलेल्यापैकी काही वाचतील. आणि सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यासाठी ते दरवर्षी येतील. मंडपाचा सण साजरा करायला ते यरुशलेमला येतील.
पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामालापूर्वीच सुवार्ता सांगितली की, “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
हे प्रभु, सर्व लोक तुला घाबरतील सर्व लोक तुझ्या नावाची स्तुति करतील. फक्त तूच पवित्र आहेस सर्व लोक येऊन तुझीउपासना करतील कारण तुझी नीतीमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.”
राष्ट्रे त्या दिव्याच्या प्रकाशात चालतील. आणि जगातील राजे आपले वैभव त्या नगराकडेआणतील.