Home Bibles जखऱ्या 5:4 · मराठी बायबल
जखऱ्या 5:4 · मराठी बायबल

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो: मी हा पट चोरांच्या आणि माझ्या नावाने खोटी वचने देणाऱ्या लोकांच्या घरी पाठवीन. तो तेथेच राहील आणि त्या घरांचा नाश करील. दगड व लाकडी खांबांचासुध्दा नाश होईल.”

Cross references

लेवीय 14:34

“कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यात जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्ठा पाडला,

अनुवाद 7:26

त्या अमंगळ, हानिकारक मूर्ती तुम्ही घरीही आणू नका. त्यांची घृणा बाळगा आणि त्या नष्ट करुन टाका.’

अनुवाद 28:16

“नगरात आणि शेतात तुम्ही शापित व्हाल.

यहोशवा 9:20

आता आपल्याला त्यांना धक्का लावता येणार नाही त्यांना जीवदान दिले पाहिजे. आता त्यांना इजा केल्यास, त्यांना आपण दिलेला शब्द मोडला म्हणून देवाचा आपल्यावर कोप होईल.

ईयोब 8:15

तो जर कोळ्याच्या जाळ्यावर टेकला तर ते मोडेल. त्याने त्याचा आधार घेतला तरी ते त्याला आधार देऊ शकणार नाही.

ईयोब 8:22

पण तुझे शत्रू मात्र लज्जेची वस्त्रे घालतील आणि दुष्ट माणसांची घरे नष्ट होतील.”

ईयोब 18:15

त्याच्या घरात काहीही शिल्लक राहाणार नाही. का? कारण त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरण्यात येईल.

ईयोब 20:26

त्याच्या खजिन्याचा नाश होईल. मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्री त्याचा नाश करेल. अग्री त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल.

नीतिसूत्रे 3:33

परमेश्वर वाईट लोकांच्या कुटुंबाविरुध्द असतो. परंतु जे लोक योग्य रीतीने जगतात त्यांच्या कुटुंबांना तो आशीर्वाद देतो.

हबक्कूक 2:9

हो! खरेच! चुकीच्या मार्गाने श्रीमंत होणाऱ्या माणसाचे भले होणार नाही. हा माणूस सुरक्षित जागी राहायला मिळावे, म्हणून अशा गोष्टी करतो. त्याच्या उंच इमारतीमुळे तो वाचू शकेल असे त्याला वाटते. पण त्याचे वाईट होईल.

मलाखी 3:5

मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. लोकांनी केलेल्या वाईट गोष्टी न्यायाधीशाला सांगणाऱ्या माणसाप्रमाणे मी असेन काही लोक दुष्टपणे जादूटोणा करतात. काही व्यभिचाराचे पाप करतात. काही खोटी वचने देतात. काही आपल्या मजुरांना फसवितात. ते मजुरांना कबूल केल्याप्रमाणे मजुरी देत नाहीत. लोक विधवांना व अनाथांना मदत करीत नाहीत. परक्याला कोणी मदत करीत नाही. माझा लोक मान राखत नाहीत.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

याकोब 5:2

तुमची संपति नाश पावली आहे. व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.

Interlinear

Choose Theme