मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत माझ्याजवळ आला व त्याने मला जागे केले. झोपेतून जागा होणाऱ्या माणसाप्रमाणे मला वाटले.
Cross references
एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करुन म्हणाला, “उठ खाऊन घे.”
हे ऐकल्यानंतर, मी (यिर्मया) उठलो, आणि आजूबाजूला पाहिले. ती खरोखरच फार सुखद निद्रा होती.
गाब्रीएल बोलत असताना मी जमिनीवर पडलो व झोपी गेलो. मला अगदी गाढ झोप लागली. मग गाब्रीएलने मला स्पर्श केला व माझ्या पायावर उभे केले.
मग मी एकटाच उरलो .मी दृष्टान्त पाहात होतो. त्या दृष्टान्ताने मी सुध्दा घाबरलो. माझा धीर खचला. मृत माणसाच्या चेहऱ्याप्रमाणे माझा चेहरा पांढराफटक पडला, मी असहाय झालो.
मी विचारले, “महाराज, हे घोडे इकडे कशाकरिता?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत म्हणाला, “हे घोडे इकडे कशाकरिता आलेत हे मी तुला दाखवीन.”
माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या दूताला मग परमेश्वराने उत्तर दिले. परमेश्वर चांगल्या व सांत्वनपर शब्दांत बोलला.
माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी त्या शिंगांचा अर्थ विचारला.तो म्हणाला, “इस्राएल, यहूदा व यरुशलेम येथील लोकांना देशोधडीला लावण्यास ह्याच शिंगांनी भाग पाडले.”
मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून गेला. आणि दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला.
मग परमेश्वराच्या दूताने यहोशवाला पुढील गोष्टी सांगितल्या:
पण पेत्र व त्याच्याबरोबर असलेले सर्व झोपी गेले होते, जेव्हा ते जागे झाले, त्यांनी येशूचे गौरव पाहिले, आणि दोन मनुष्यांना त्याच्याबरोबर उभे असलेले पाहिले.
आणि जेव्हा प्रार्थना करुन तो उठला आणि शिष्यांकडे आला तेव्हा ते त्यांच्या दु:खामुळे थकून जाऊन झोपी गेलेले आढळले.