Home Bibles गीतरत्न 6:12 · मराठी बायबल
गीतरत्न 6:12 · मराठी बायबल

मला काही कळायच्या आतच माझ्या आत्म्याने मला राजाच्या लोकरथात ठेवले.

Cross references

यिर्मया 31:18

एफ्राईमला रडताना मी ऐकले आहे. एफ्राईमला मी पुढील गोष्टी बोलताना ऐकले आहे. ‘परमेश्वर तू खरोखरच मला शिक्षा केलीस आणि मी धडा शिकलो. मी बेबंद वासराप्रमाणे होतो. कृपा करुन मला शिक्षा करण्याचे थांबव. मी तुझ्याकडे परत येईन. तू खरोखरच, परमेश्वर, माझा देव आहेस.

होशेय 11:8

“एफ्राईम, तुला सोडून देण्याची माझी इच्छा नाही. इस्राएल, तुझे रक्षण करावे असे मला वाटते. अदमाह किवा सबोईम यांच्यासारखी तुझी स्थिती करावी असे मला वाटत नाही. माझे मन:परिवर्तन होत आहे. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम अतिशय उत्कट आहे.

लूक 15:20

मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्या पडले आणि त्याचे मुके घेतले.

Interlinear

Choose Theme