Home Bibles रूथ 3:1 · मराठी बायबल
रूथ 3:1 · मराठी बायबल

काही दिवसांनी रूथची सासू नामी रूथला म्हणाली, “मुली, आता मला तुझ्यासाठी नवरा आणि चांगले घर शोधून काढायला हवें. त्यातच तुझे भले आहे.

Cross references

उत्पत्ति 40:14

परंतु तुला तुरुंगातून सोडल्यावर माझी आठवण कर, व माझ्यावर कृपा करुन मला मदत कर. माझ्या संबंधी फारोला सांग म्हणजे मग मी ह्या तुरुंगातून सुटेन.

अनुवाद 4:40

आज मी तुम्हाला त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.

रूथ 1:9

परमेश्वर कृपेने तुम्हाला नवरा, सुखाचे घरदार मिळो” एवढे म्हणून नामीने त्यांचे चुंबन घेतले आणि तिघीना रडू कोसळले.

स्तोत्रसंहिता 128:2

तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील.

यिर्मया 22:15

यहोयाकीम, तुझ्या घरात खूप गंधसरु आहे म्हणून त्यामुळे काही तू मोठा राजा होत नाहीस. तुझे वडील योशीया अन्नपाण्यावरच समाधानी होते. त्यांनी फक्त योग्य व न्याय्य गोष्टीच केल्या. त्यांच्या ह्या कृत्यांमुळे त्यांच्याबाबतीत सर्व सुरळीत झाले.

1 करिंथकरांस 7:36

जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेविषयी योग्य ते करीत नाही आणि जर त्याच्या भावना तीव्र आहेत, तर त्या दोघांनी पुढे होऊन लग्न करुन घेणे आवश्यक आहे. त्याला जे वाटते ते त्याने करावे.

1 तीमथ्याला 5:8

पण जर कोणी त्याच्या स्वत:च्या नातेवाईकासाठी आणि विशेषत: त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे. व तो अविश्वासू माणसांपेक्षा वाईट आहे.

1 तीमथ्याला 5:14

यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्ने करावीत. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या शत्रूला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.

Interlinear

Choose Theme