Home Bibles रूथ 2:3 · मराठी बायबल
रूथ 2:3 · मराठी बायबल

नामीने तिला बरं म्हणून अनुमती दिली.रूथ शेतावर गेली कापणी करणाऱ्यांच्या मागे फिरत उरले सुरले धान्य ती वेचू लागली योगायोग असा की हे शेत अलीमलेखाचा नातेवाईक बवाज याच्याच मालकीचे होते.

Cross references

2 शमुवेल 1:6

यावर तो तरुण सैनिक म्हणाला, “योगायोगाने मी गिलबोवाच्या डोंगरावरच होतो. तिथे शौल आपल्या भाल्यावर पडलेला मला दिसला. पलिष्ट्यांचे रथ आणि घोडेस्वार त्याच्या अगदी नजीक येऊन ठेपले होते.

2 शमुवेल 20:1

शबा नावाचा एक माणूस तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबी अगदी कुचकामी पण खोडसाळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांना गोेळा केले आणि त्यांना म्हणाला,“दावीदाकडे आपला भाग नाही. या इशायच्या मुलात आपला वाटा नाही इस्राएलींनो, चला आपापल्या डेऱ्यात परत.”

2 राजे 8:5

अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती बाई राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती बाई आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.”

एस्तेर 6:1

त्याच दिवशी रात्री राजाला झोप येईना. म्हणून त्याने एका सेवकाला कालवृत्तांत आणायला सांगून वाचून दाखवायला सांगितला. (एखाद्या राजाच्या कारकिर्दीतील सगव्व्या घडामोडी या राजंच्या इतिहासग्रंथात नोंदवलेल्या असतात.)

मत्तय 10:29

दोन चिमण्या एका पैशाला विकत नाहीत का? तरीही तुमच्या पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही.

लूक 10:31

तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्याला पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला.

1 थेस्सलनीकाकरांस 4:11

आम्ही तुम्हांला आज्ञा केल्याप्रमाणे शांततापूर्ण जीवन जगण्याची, आपले काम आपण करण्याची, आणि आपल्या स्वत:च्या हातांनी काम करण्याची इच्छा करा.

2 थेस्सलनीकाकरांस 3:12

आम्ही अशा लोकांना आज्ञा करतो व प्रभु येशू ख्रिस्तामध्ये बोध करतो की, त्यांनी शांतीने काम करावे आणि स्वत:ची भाकर स्वत:च मिळवून खावी.

Interlinear

Choose Theme