Home Bibles रूथ 1:10 · मराठी बायबल
रूथ 1:10 · मराठी बायबल

“आम्हाला तुमच्याबरोबर आणि तुमच्याच लोकात यायचे आहे” असे त्या दोघी नामीला म्हणू लागल्या.

Cross references

रूथ 1:7

तव्हा त्या ज्या ठिकाणी राहात होत्या ते ठिकाण सोडून त्या यहूदाला परत जायला निघाल्या.

स्तोत्रसंहिता 16:3

परमेश्वर त्याच्या पृथ्वीवरील भक्तांसाठी अनेक अद्भुत गोष्टी करतो. परमेश्वर त्या लोकांवर खरोखरच प्रेम करतो हे तो दाखवतो.

स्तोत्रसंहिता 119:63

जो कुणी तुझी उपासना करतो त्याचा मी मित्र आहे. जो कुणी तुझ्या आज्ञा पाळतो त्याचा मी मित्र आहे.

जखऱ्या 8:23

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक यहूदाकडे येऊन त्याचा कोट पकडून त्याला विचारतील, ‘देव तुमच्याबरोबर आहे असे आम्ही ऐकलंय! त्याची उपासना करण्यासाठी आम्ही तुझ्याबरोबर येऊ का?”

Interlinear

Choose Theme