Home Bibles रोमकरांस 8:36 · मराठी बायबल
रोमकरांस 8:36 · मराठी बायबल

असे लिहिले आहे की,“दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत. आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात.”

Cross references

स्तोत्रसंहिता 44:22

देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.

स्तोत्रसंहिता 141:7

लोक जमीन खणतात आणि नांगरतात आणि सभोवताली घाण टाकतात. त्याच रीतीने हाडे त्यांच्या थडग्यांभोवती विखरुन टाकली जातील.

यशया 53:7

त्याला इजाही झाली आणि शिक्षाही झाली. पण त्याने कधीही तक्रार केली नाही. ठार मारायला नेणाऱ्या मेंढीप्रमाणे तो अगदी गप्प राहिला. मेंढ्यांची लोकर कापताना तो जसा शांत असतो तसा तो शांत होता. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने कधीही तोंड उघडले नाही.

यिर्मया 11:19

लोक माझ्याविरुद्ध असल्याचे समजण्यापूर्वी मी कत्तल होण्याची वाट पाहणाऱ्या गरीब कोकरासारखा होतो. ते माझ्याविरुद्ध आहेत याची मला कल्पना नव्हती. “आपण या झाडाचा आणि त्याच्या फळांचा नाश करु. आपण त्याला मारुन टाकू म्हणजे लोक त्याला विसरतील” असे ते माझ्याबद्दल म्हणत.

यिर्मया 12:3

पण, परमेश्वरा, तू माझे मन जाणतोस. तू मला पाहतोस आणि माझ्या मनाची परीक्षा घेतोस. कत्तल करण्यासाठी मेंढ्यांना जसे फरपटत आणतात, तसे त्यांना फरपटत आण. कत्तलीच्या दिवसासाठी त्यांची निवड कर.

यिर्मया 51:40

“बाबेल, मरणाची वाट पाहणाऱ्या शेळ्या, मेंढ्या, एडके ह्यांच्याप्रमाणे, असेल. मी त्यांना त्यांची कत्तल करण्यासाठी घेऊन जाईन.

योहान 16:2

ते तुम्हांला सभास्थानाच्या बाहेर काढतील; खरे पाहता अशी वेळ येत आहे की, जो कोणी तुमचा जीव घेईल त्याला वाटेल की, आपण देवाची सेवाच करीत आहोत.

प्रेषितांचीं कृत्यें 8:32

पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता, तो भाग पुढीलप्रमाणे होता:“वधायला नेत असलेल्या मेंढरासारखा तो होता. लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 20:24

मी माइया जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभु येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे - ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.

1 करिंथकरांस 4:9

कारण मला वाटते की देवाने आम्हांला मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच माणसांना जाहीर प्रदर्शनसारखे झालो आहोत.

1 करिंथकरांस 15:30

आम्हीसुद्धा प्रत्येक घटकेला धोक्याला का तोंड देतो?

2 करिंथकरांस 4:10

आम्ही नेहमी येशूचे मरण आमच्या शरीरात घेऊन जात असतो. यासाठी की ख्रिस्ताचे जीवनही आमच्या शरीराद्वारे प्रकट व्हावे.

Interlinear

Choose Theme