सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर त्याची सुंता न होणे हे सुंता झाल्याप्रमाणेसमजण्यात येणार नाही काय?
Cross references
यहुदी नसलेले काही लोक परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या प्रेमाखातर स्वत:हून परमेश्वराला येऊन मिळतील. ते परमेश्वराचे सेवक होण्यासाठी येतील. ते शब्बाथचा दिवस हा उपासनेचा विशेष दिवस मानतील. आणि काटेकोरपणे माझ्या कराराचे (नियमांचे) सतत पालन करतील.
मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ जण पूर्वेकडून आणी पश्चिमेकडून येतील आणि अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्यासह स्वर्गाच्या राज्यात मेजासभोवती मेजवानीसाठी बसतील.
तेव्हा येशूने तिला म्हटले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होवो.” आणी तिची मुलगी बरी झाली.
कर्नेल्य हा धर्मशील असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता. तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
पेत्राने बोलायला सुरुवात केली: “मला आता हे खरोखर समजले आहे की, देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.
ते म्हणाले, “जे सुंता न झालेले वयहूदीतर आहेत अशा लोकांच्या घरी तुम्ही गेला, एकढेच नव्हे तर तुम्ही त्यांच्यासह जेवणही केले!”
ज्याअर्थी देव एकच आहे, त्याअर्थी तो ज्यांची सुंता झाली आहे, त्यांच्या विश्वासाने आणि ज्यांची सुंता झालेली नाही अशांनाही विश्वासाने नीतिमान ठरवील.
यासाठी की, नीतिच्या व आवश्यक गोष्टी आपण जे देहाच्या पापमय स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आमच्याद्वारे पूर्ण व्हाव्यात.
एखाद्याला जेव्हा देवाने पाचारण केले होते तेव्हा त्याची अगोदरच सुंता झाली होती काय? त्याने आपली सुंता लपवू नये. कोणाला सुंता न झालेल्या स्थितीत पाचारण झाले काय, तर त्याने सुंता करु नये.
म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते.
कारण आम्हीच खरे सुंता झालेले लोक आहोत, आणि आम्ही जे देवाच्या आत्म्याने त्याची सेवा करतो ते आम्ही येशू ख्रिस्ताचा अभिमान बाळगतो आणि ऐहिक गोष्टींवर विश्वास ठेवीत नाही.
मानवी हातांनी न केलेल्या सुंतेने तुम्हीसुद्धा त्याच्यामध्ये सुंता झालेले आहात. ख्रिस्ताने केलेल्या सुंतेद्वारे तुम्ही तुमच्या पापाच्या सामर्थ्यापासून मुक्त झाला होता,