त्याशिवाय त्यांच्या घरी जी मंडळी जमते तिलाही सलाम सांगा.माझा प्रिय मित्र अपैनत जो ख्रिस्तासाठी आशिया खंडातील प्रथम फळ आहे यालाही सलाम सांगा.
Cross references
हे खरे आहे काऱण तुमच्यापैकी जर दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”
जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्याला न्यायसभेपुढे उभे केले.
अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्याला उत्तेजन दिले. आणि तेथील येशूच्या अनुयायांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले. जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे (येशूवर) विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली.
जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत.
कारण मासेदोनिया आणि अखिया येथील मंडळ्यांनी यरुशलेमेतील गरीब संत जनांना मदत करण्याचे ठरविले आहे.
प्रभुमध्ये माझा प्रिय आंप्लियात याला सलाम सांगा.
त्रुफैना आणि त्रफीसा जे प्रभूमध्ये श्रम करणारे आहेत त्यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस जिने प्रभूमध्ये फार श्रम केले आहेत तिला सलाम सांगा.
बंधूंनो, मी तुम्हांला बोध करतो तुम्हांला स्तेफनच्या घराची माहिती आहे आणि जाणीवही आहे की ते अखयाचे प्रथम फळ आहे. त्यांनी स्वत: संतांची सेवा करण्याचे ठरविले आहे.
आशियातील मंडळ्या तुम्हांला सलाम सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हांला फार सलाम सांगतात,
देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रषित झालेला पौल याजकडून, तसेच आपला बंधु तीमथ्य याजकडून, देवाची करिंथ येथील मंडळी आणि अखयातील संपूर्ण प्रदेशातील देवाच्या लोकांना
कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे. आणि मी मासेदोनियातील लोकांना याविषयी अभिमानाने सांगत होतो की, गेल्या वर्षापासून अखयातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात आणि तुमच्या जोशामुळे पुष्कळ जण कृति करण्यास आवेशाने पुढे आले आहेत.
लावदिकीयात राहणारे बंधु आणि नेफा आणि तिच्या घरी जमणारी मंडळी यांना सलाम सांगा.
आणि आमची बहीण अफ्फिया, अर्खिप्प, आमचा सहसैनिक, आणि तुझ्या घरात जी मंडळी एकत्र येते, यांना:
सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण “प्रथम फळ” व्हावे यासाठी त्याने असे केले.
वडिलाकडून,माझ्या प्रिय मित्र गायस ज्याच्यावर मी सत्यामध्येप्रीति करतो त्यास,
हे लोक असे होते की त्यांनी स्त्रियांशी वाईट कर्म करुन स्वत:ला भ्रष्ट केले नाही. त्यांनी स्वत:ला शुद्ध राखले. कोकरा जेथेगेला तेथे ते गेले. हे पृथ्वीवरील लोकांमधून खंडणी भरुन मुक्त केलेले होते. देवाला आणि कोकऱ्याला अर्पिलेले ते पाहिलेआहेत.