तेव्हा तू आपल्या बलवान भावाला दोष का लावतो? किंवा जो अशक्त आहे त्या भावाला तुच्छ का मानतोस? कारण आपण सर्व जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
Cross references
“मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी आसनावर बसेल.
हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्याला पिलाताकडे परत पाठविले.
याशिवाय, पिता कोणाचाही न्याय करीत नाही. परंतु न्याय करण्याचा सर्व अधिकार पित्याने पुत्राला दिलेला आहे.
‘तुम्ही बांधणारांनी जो दगड नापसंत केला, जो पुढे कोनशिल झाला तोच हा येशू होय.’
येशूने आम्हांला लोकांना उपदेश करायला सांगितले. जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्याला आपल्याला आहे हे सांगण्यासाठी त्याने आम्हांला आज्ञा केली.
देवाने एक दिवस ठरविलेला आहे, ज्या दिवशी तो जगातील प्रत्येक व्यक्तीचा न्याय करील. तो नि:पक्षपाती असेल, हे करण्यासाठी तो एका माणासाचा (येशूचा) वापर करील. देवाने त्याला फार पूर्वीच निवडले आहे. व प्रत्येक माणसाला देवाने हे दाखवून दिले आहे; त्या माणसाला मरणातून पुन्हा उठवून दाखवून दिले आहे!”
जेव्हा देव येशू ख्रिस्ताद्वारे मनुष्यांच्या रहस्यांचा, माझ्या सुवार्तेप्रमाणे न्याय करील त्या दिवशी या गोष्टी घडतील.
जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो त्याने जो काही विशिष्ट गोष्टी खात नाही, त्याला तुच्छ मानू नये. आणि जो काही विशिष्ट गोष्टी खातो त्याने त्याला दोष देऊ नये कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभु येईपर्यंत न्यायनिवाडा करु नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंत: करणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
कारण आम्हांला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. आणि प्रत्येकाला त्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षिस मिळेल.देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे
हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य यानेसुद्धा या लोकांविषयी असेच भाकीत केले आहे: “पाहा हजारो पवित्रदेवदूतांसह प्रभु येत आहे.
नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मीपाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.