Home Bibles प्रकटीकरण 8:3 · मराठी बायबल
प्रकटीकरण 8:3 · मराठी बायबल

दुसरा देवदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला. या देवदूताकडे सोनेरी धूप ठेवण्याचे भांडे होते, त्यांच्याकडे धूपप्रार्थनेसह अर्पण करण्यासाठी दिले होते. ह्या प्रार्थना देवाच्या पवित्र पवित्र लोकांच्या होत्या. देवदूताने त्याचे अर्पणसिंहासनासमोर सोनेरी वेदीवर ठेवले.

Cross references

उत्पत्ति 48:15

आणि इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद दिला; तो म्हणाला,“माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक यांनी आपल्या देवाची उपासना केली व त्याच देवाने मला माझ्या सर्व आयुष्यभर चालवले आहे;

निर्गम 3:2

त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वरच्या दूताला पाहिले. मोशेन असे पाहिले की झुडूप जळत होते परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते.

निर्गम 30:1

देव मोशेला म्हणाला, “धूप जाळण्यासाठी बाभळीच्या लाकडाची एक वेदी करावी.

निर्गम 37:25

मग त्याने बाभळीच्या लाकडाची एक चौरस वेदी केली; ती अठरा इंच लांब, अठरा इंच रुंद व छत्तीस इंच उंच होती; वेदीवर प्रत्येक कोपऱ्याला एक याप्रमाणे चार शिंगे होती. ती वेदीला अशी जोडली होती की वेदी व शिंगे एका अखंड तुकड्याची बनविलेली दिसत होती.

निर्गम 40:26

मग त्याने दर्शनमंडपात अंतरपटासमोर सोन्याची वेदी ठेवली.

लेवीय 16:12

नंतर त्याने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.

गणना 16:46

नंतर मोशे अहरोनला म्हणाला, “तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर उद-धूप टाक. लवकर लोकांकडे जा आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी काहीतरी कर. परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. आजार पसरायला सुरुवात झाली होती.”

2 इतिहास 26:16

पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.

स्तोत्रसंहिता 141:2

परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. ती जळणाऱ्या धूपाप्रमाणे असू दे. ती संध्याकाळच्या अर्पणा प्रमाणे असू दे.

आमोस 9:1

मी प्रभूला वेदीजवळ उभे असल्याचे पाहिले तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यावर मार मग इमारत अगदी उंबऱ्यापासून हादरेल. खांब लोकांच्या डोक्यावर पाड. कोणी जिवंत राहिल्यास, मी त्याला तलवारीने ठार मारीन. एखादा पळून जाईल, पण सुटणार नाही. लोकांपैकी एकही सुटून पळू शकणार नाही.

मलाखी 1:11

“सर्वजगातील लोक माझ्या नावाचा मान राखतात. सर्व जगातील लोक मला उत्तम भेटी आणतात. भेट म्हणून उत्तम धूप माझ्यापुढे जाळतात. का? कारण त्या सर्व लोकांना माझ्या नावाचे महत्व वाटते.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

लूक 1:10

जेव्हा धूप जाळण्याच्या वेळी सर्वजण बाहेर जमून प्रार्थना करीत होते,

प्रेषितांचीं कृत्यें 7:30

चाळीस वर्षांनंतर मोशे सीनाय पर्वताजवळच्या वाळवंटात होता. एका जळणाऱ्या झुडपांत मोशेला देवदूताचे दर्शन झाले.

रोमकरांस 8:34

दोषी ठरवितो तो कोण? जो मेला आणि याहीपेक्षा अधिक महत्तवाचे म्हणजे जो उठविला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, जो आपल्या वतीने मध्यस्थी करतो तो ख्रिस्त येशू आहे.

इब्री लोकांस 4:15

कारण आपल्याला लाभलेला माहन याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला.

इब्री लोकांस 7:25

म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.

इब्री लोकांस 9:4

त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी होती. आणि कराराची पेटी (कोष).ही पेटी (कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत (कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या.

इब्री लोकांस 10:19

म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो.

1 योहान 2:1

माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करु नये यासाठी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे, पण जर एखादा पाप करतो तरपित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे.

प्रकटीकरण 5:8

आणि जेव्हा त्याने ती घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीसवडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक उदाने भरलेल्या सोन्याच्या वाट्याहोत्या. या वाट्या म्हणजे देवाच्या लोकांच्या प्रार्थना होत्या.

प्रकटीकरण 6:9

जेव्हा त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी काही आत्मे वेदीखाली पाहिले. त्यांना देवाच्या वचनासाठी आणि त्यांनीराखलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते.

प्रकटीकरण 7:2

तेव्हा मी आणखीएक देवदूत पूर्वेकडून वर येताना पाहिला. या देवदूताकडे जिवंत देवाचा शिक्का होता. या देवदूताने त्या चार देवदूतांनामोठ्या आवाजात बोलाविले. हे चार देवदूत असे होते की ज्यांना देवाने पृथ्वी व समुद्राला इजा करण्याचे सामर्थ्य दिले.देवदूत त्या देवदूतांना म्हणाला,

प्रकटीकरण 8:4

धुपाचा धूर देवदूताच्या हातातून देवाच्या सिंहासनासमोर गेला. धूर देवाच्या लोकांच्याप्रार्थनेसह गेला.

प्रकटीकरण 9:13

सहाव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा मी देवासमोर असलेल्या सोनेरी वेदीवरुन चारपैकी एका शिंगापासूनयेणारा आवाज ऐकला.

प्रकटीकरण 10:1

मग मी आणखी एक शक्तीशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावरमेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता, त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते.

Interlinear

Choose Theme