Home Bibles ☰ Books प्रकटीकरण 8:1 · मराठी बायबल
प्रकटीकरण 8:1 · मराठी बायबल

कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला. तेव्हा स्वर्गात अर्धा तासपर्यंत सर्वत्र शांतता होती.

Cross references

ईयोब 4:16

तो आत्मा निश्र्चल उभा राहिला पण ते काय होते ते मला दिसू शकले नाही. माझ्या डोळ्यांसमोर एक आकार होता आणि सर्वत्र शांतता होती. आणि नंतर मला एक हलका आवाज ऐकू आला:

स्तोत्रसंहिता 37:7

परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.

स्तोत्रसंहिता 62:1

देवाने माझा उध्दार करावा म्हणून मी धीराने वाट पहात आहे. माझे तारण त्याच्याकडूनच येते.

हबक्कूक 2:20

पण परमेश्वर वेगळा आहे. परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे. म्हणूनच सर्व पृथ्वीवर शांतता असावी व सर्वानीच परमेश्वराचा मान राखावा.

जखऱ्या 2:13

सर्वजण शांत राहा! आपल्या पवित्र निवासातून परमेश्वर येत आहे.

प्रकटीकरण 5:1

मग मी, जो सिंहासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते.आणि ती गुंडाळी सात शिक्के मारुन बंद केली होती.

प्रकटीकरण 5:9

आणि त्यांनी नवे गाणे गाईले:“तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास समर्थ आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्तानेमनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्टांतून विकत घेतले.

प्रकटीकरण 6:1

मग मी पाहिले की, कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक उघडला. मी त्या चार जिवंत प्राण्यांपैकी एकाला ढगाच्यागडगडाटासारखे बोलताना ऐकले. तो म्हणाला, “ये!”

प्रकटीकरण 6:3

जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला बोलताना ऐकले. तो म्हणाला, “ये!”

प्रकटीकरण 6:5

जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तेव्हा मी तिसऱ्या जिवंत प्राण्याला बोलताना ऐकले, “ये!” मी पाहिले तेव्हामाइयासमोर काळा घोडा होता व घोडेस्वराच्या हातात तराजू होते असे मला दिसले

प्रकटीकरण 6:7

जेव्हा त्याने चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याचा आवाज ऐकला. तो म्हणाला, “ये आणि पाहा!”

प्रकटीकरण 6:9

जेव्हा त्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी काही आत्मे वेदीखाली पाहिले. त्यांना देवाच्या वचनासाठी आणि त्यांनीराखलेल्या साक्षीमुळे ठार मारण्यात आले होते.

प्रकटीकरण 6:12

मग कोकऱ्याला सहावा शिक्का उघडताना मी पाहिले. तेव्हा मोठा भूकंप झाला, सूर्य मेंढीच्या केसांपासून बनविलेल्याकाळ्या कापडासारखा झाला, पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला.

Interlinear

Choose Theme