Home Bibles ☰ Books प्रकटीकरण 7:16 · मराठी बायबल
प्रकटीकरण 7:16 · मराठी बायबल

त्या लोकांना पुन्हाकेव्हाच भूक लागणार नाही. त्यांना पुन्हा केव्हाच तहान लागणार नाही, सूर्यामुळे त्यांना बाधा होणार नाही. कोणतीहीउष्णता त्यांना जाळून टाकणार नाही.

Cross references

स्तोत्रसंहिता 42:2

माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?

स्तोत्रसंहिता 63:1

देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.

स्तोत्रसंहिता 121:6

ख पोहोचवणार नाही. आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही.

स्तोत्रसंहिता 143:6

परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझी प्रार्थना करतो. तहानेली जमीन जशी पावसाची वाट बघते तशी मी तुझ्या मदतीची वाट बघत आहे.

गीतरत्न 1:6

मी किती काळी आहे, सूर्याने मला किती काळे केले आहे याकडे बघू नका. माझे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी माझ्यावर त्यांच्या द्राक्षांच्या मळ्याची काळजी घ्यायची सक्ती केली. त्यामुळे मला स्वत:चीकाळजी घेता आली नाही.

यशया 4:5

ह्यावेळी आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे देव सिध्द करील. दिवसा तो धुराचा ढग तयार करील व रात्री अग्नीचा झगझगीत प्रकाश निर्माण करील. प्रत्येक इमारतीवरच्या आकाशात आणि सीयोनच्या डोंगरावरील मेळाव्याच्या जागेवर देवाच्या कृपेच्या ह्या निशाण्या दिसतील. संरक्षणासाठी प्रत्येक माणसावर आच्छादन असेल.

यशया 25:4

परमेश्वरा, तू गरजू गरीब लोकांचा आसरा आहेस. त्यांच्यापुढील अनेक समस्या त्यांना खच्ची करू पाहतात पण तू त्यांचे रक्षण करतोस. परमेश्वरा, तू उन्हापावसापासून रक्षण करणाऱ्या निवाऱ्यासारखा आहेस. पीडा या तुफान वादळ व पावसासारख्या असतात. पण पावसाची झड भिंतीवर आपटून खाली पडते. घरातल्या लोकांना तिचा त्रास होत नाही.

यशया 32:2

असे जर झाले तर वारा व पाऊस ह्यापासून बचाव करण्यासाठी जसा अडोसा असतो तसा राजा निवाऱ्याची जागा होईल. वाळवंटातील झऱ्याप्रमाणे अथवा उष्ण प्रदेशातील मोठ्या खडकाखालील सावलीसारखा लोकांना तो वाटेल.

यशया 41:17

“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

यशया 49:10

लोक उपाशी राहणार नाहीत. ते तहानेलेही राहणार नाहीत. तळपणारा सूर्य आणि उष्ण वारे त्यांना इजा करणार नाहीत. का? कारण देव त्यांचे दु:ख हलके करील आणि त्यांना घेऊन जाईल तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल.

यशया 65:13

तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही पापी भुकेले राहाल. माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले राहाल. माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल.

योना 4:8

सूर्य डोक्यावर असताना, परमेशवराने गरम पूर्वेचा वारा निर्माण केला. त्याने मरणासाठी परमेशवराची विनवणी केली तो म्हणाला माझ्या मताने जगण्यापेक्षा मरणे बरे!”

Interlinear

Choose Theme