Home Bibles प्रकटीकरण 21:7 · मराठी बायबल
प्रकटीकरण 21:7 · मराठी बायबल

जो विजय मिळवितो, त्याला या सर्व गोष्टी मिळतील, मी त्याचा देवहोईन, व तो माझा पुत्र होईल.

Cross references

1 शमुवेल 2:8

गरीबांना धुळीतून उचलून त्यांचे दु:ख हरणत्यांचा गौरव करुन त्यांना राजपुत्रांच्या बरोबरीने बसवतो, मानाचे स्थान देतो. जगाची निर्मिती परमेश्वरानेच केली. सर्वजगावर त्याचीच सत्ता आहे.

नीतिसूत्रे 3:35

शहाणे लोक सन्मान प्राप्त होईल असे जीवन जगतात परंतु मूर्ख लोक लाज वाटण्यासारखे जीवन जगतात.

यशया 65:9

मी याकोबच्या (इस्राएलच्या) काही लोकांना ठेवीन. यहूदातील काही लोकांना माझा डोंगर मिळेल. माझे सेवक तेथे राहतील. तेथे राहण्यासाठी मी लोकांची निवड करीन.

जखऱ्या 8:8

मी त्यांना परत येथे आणि ते यरुशलेममध्ये राहतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा कृपावंत वश्रध्दावान देव होईल.”

मत्तय 19:29

ज्याने ज्याने माझ्या मागे येण्याकरिता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्याला त्यापेक्षा कितीतरी जास्तापटीने लाभ होईल व त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.

मत्तय 25:34

“मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे.

मार्क 10:17

येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुडे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”

रोमकरांस 8:15

पुन्हा भीति वाटू नये म्हणून तुम्हांला गुलामगिरीचा आत्मा मिळाला नाही, तर तुम्हांला दतकपणाचा आत्मा मिळाला आहे. त्याच्यायोगे आम्ही “अब्बा, बापा” अशी हाक मारतो.

1 करिंथकरांस 3:21

म्हणून मनुष्यांविषयी कोणीही फुशारकी मारु नये. कारण सर्व गोष्टी तुमच्या आहेत.

2 करिंथकरांस 6:18

“मी तुम्हांला पिता असा होईन, तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो”.2 शमुवेल 7:14; 7:8

इब्री लोकांस 8:10

परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा कराक करीन; मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात घालीन, त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होइन, ते माझे लोक होतील.

1 पेत्र 1:3

आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली.

1 पेत्र 3:9

वाइटाची परतफेड वाइटाने करु नका, किंवा अपमानाची फेड अपमानाने करु नका. उलट, त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा. कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते. यासाठी की, तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा.

1 योहान 3:1

पित्याने आपल्यावर जे महान प्रेम केले आहे त्याविषयी विचार करा. आम्हांला देवाची मुले म्हणण्यापर्यंत त्याने प्रेम केले!आणि आम्ही खरोखरच (देवाची मुले) आहोत! या कारणामुळे जग आम्हाला ओळखत नाही, कारण त्यांनी (जगाने)ख्रिस्ताला ओळखले नाही.

प्रकटीकरण 2:7

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवितो त्याला मी जीवनाच्या झाडाचे(फळ) खाण्याचा अधिकार देईन. ते झाड देवाच्या सुखलोकात आहे.

प्रकटीकरण 2:11

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजाहोणारच नाही.

प्रकटीकरण 2:17

“आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला मी लपवून ठेवलेल्यामान्यातून काही देईन. मी त्याला पांढरा दगड (खडा) देईन ज्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो प्राप्त होईलत्यालाच ते समजेल.

प्रकटीकरण 2:25

मी येईपर्यंतजे तुमच्याकडे आहे त्याला धरुन राहा.

प्रकटीकरण 21:3

आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली.ती वाणी म्हणाली, “आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे. आणि तो त्यांच्या बरोबर राहील. आणि तो त्यांचा देवहोईल.

Interlinear

Choose Theme