Home Bibles प्रकटीकरण 21:16 · मराठी बायबल
प्रकटीकरण 21:16 · मराठी बायबल

नगर चौरस आकाराचे होते. त्याची लांबी व रुंदी सारखीच होती. देवदूताने सोन्याच्यामोजपट्टीने नगराचे माप मोजून पाहिले. ते पंधरा हजार मैलभरले. नगराची लांबी, रुंदी व उंची समसमान होत्या.

Cross references

यहेज्केल 41:4

मग त्या माणसाने दालनाची लांबी मोजली. ती 20 हात (35फूट) लांब व 20 हात (35फूट) रुंद होती. मधल्या दालनात प्रवेश करण्याआधी तो मला म्हणाला, “ही सर्वांत पवित्र जागा आहे.”

यहेज्केल 48:8

“ह्या जमिनीचा पुढचा भाग विशेष वापरासाठी आहे. हा भाग यहूदाला मिळालेल्या जमिनीच्या दक्षिणेला आहे. हा प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे 25,000 हात (8.3मैल) लांबीचा आहे. पूर्वेकडून पश्र्चिमेकडे त्याची रुंदी इतर वंशांना मिळालेल्या जमिनीच्या रुंदी एवढीच असेल ह्या जमिनीच्या मध्यावर मंदिर असेल.

यहेज्केल 48:35

“नगरीभोवतीचे अंतर 18,000 हात (6 मैल) असेल. या क्षणापासून नगरीचे नाव परमेश्वर तेथे आहे”असे पडेल.

Interlinear

Choose Theme