Home Bibles प्रकटीकरण 20:5 · मराठी बायबल
प्रकटीकरण 20:5 · मराठी बायबल

(इतर जे मेले होते, ते एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत परत जिवंत झाले नाही) जे पाहिले पुनरुत्थानते हेच होय.

Cross references

यहेज्केल 37:2

दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होत. त्यामधून परमेश्वराने मला चालायला लावले. ती हाडे अगदी सुकलेली असल्याचे मी पाहिले.

लूक 14:14

आणि तुला आशीर्वाद मिळतील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही असणार नाही. कारण नीतीमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”

रोमकरांस 11:15

जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला. तर देवाकडून स्वीकार याचा अर्थ मेलेल्यांतून जिवंत होणे, नाही का?

फिलिप्पैकरांस 3:11

या आशेने की, मला मृतांमधून पुनरुत्थान मिळावे.

प्रकटीकरण 11:11

पण सोडेतीन दिवसांनंतर देवाकडील जीवनाच्या श्वासाने त्या साक्षीदारांमध्ये प्रवेश केला. आणि ते त्यांच्या पायांवर उभेराहिले. ज्या सर्व लोकांनी त्यांना पाहिले ते सर्व घाबरुन गेले.

प्रकटीकरण 11:15

सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले:“जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.”

प्रकटीकरण 19:20

त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्यासंदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणित्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणिखोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले.

प्रकटीकरण 20:8

आणि जगाच्या चारहीकोपऱ्यात पसरलेल्या राष्ट्रांना फसविण्यासाठी सैतान बंदीवासातून बाहेर पडेल. त्याने फसवून गोग व मागेग यांना लढाईसाठीएकत्र आणले. त्यांची संख्या सागराच्या वाळूच्या संख्येइतकी आहे.

Interlinear

Choose Theme