“बाबेल, ज्या उत्तम गोष्टींची तुला अपेक्षा होती, त्या गोष्टी आता तुइयापासून गेल्या आहेत तुझी सर्व श्रीमंती व वैभवनाहीसे झाले आहे. त्याची तुला परत कधी भरपाई होणार नाही.”
Cross references
जे विदेशी इस्राएल लोकाबरोबर राहात होते, त्यांना इतर काही पदार्थ खावेसे वाटू लागले. लवकरच इस्राएल लोकांनी पुन्हा कुरकुर करण्यास सुरवात केली. लोक म्हणाले, “आम्हांला मांस खावयास पाहिजे.
म्हणून लोकांनी त्या ठिकाणाला किब्रोथ-हत्तव्वा असे नांव दिले. कारण ह्याच ठिकाणी, ज्या लोकांना मांस खाण्याची अतिशय कडक इच्छा झाली होती त्यांना पुरण्यात आले.
नंतर त्या लोकांनी देवाची परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी त्यांची भूक भागवण्यासाठी देवाकडे अन्नाची मागणी केली.
आमचे पूर्वज वाळवंटात भुकेले झाले आणि त्यांनी शुष्क झालेल्या भूमीत देवाची परीक्षा पाहिली.
पण देव त्याला म्हणतो, “मूर्खा, जर आजा तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’
परंतु अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दू:खात आहेस.
आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये.
तुम्हांला काही गोष्टी पाहिजे असतात पण त्या तुम्हांला मिळत नाही, म्हणून तुम्ही खून करता व दुसऱ्या लोकांचा मत्सर करता पण तरीही तुम्हांला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून तुम्ही भांडण व झगडे करता. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत कारण तुम्ही देवाला मागत नाही.
कारण जगात जे सर्व काही आहे, ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना, वसंसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत.