Home Bibles प्रकटीकरण 17:9 · मराठी बायबल
प्रकटीकरण 17:9 · मराठी बायबल

“यासाठी शाहणपण असलेल्या बुद्धीची आवश्यकता आहे. सात डोकी या सात टेकड्या आहेत, ज्यावर ती स्त्री बसते.

Cross references

दानीएल 12:4

“पण, दानीएला, तू हा संदेश गुप्त ठेव तू खाते बंद करून टाक अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजेस. खूप लोक इकडे तिकडे सत्यज्ञानाचा शोध घेतील आणि सत्यज्ञान वाढेल.’

दानीएल 12:8

“मी उत्तर ऐकले पण मला त्याचा अर्थ खरोखरच कळला नाही म्हणून मी विचारले “महाराज, ह्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्यावर काय होईल.?”

होशेय 14:9

शहाण्या माणसाला या गोष्टी समजतात. चलाख माणसाने या गोष्टी शिकाव्या परमेश्वराचे मार्ग योग्य आहेत. त्यामुळे सज्जन जगतील व दुर्जन मरतील.

मत्तय 13:11

तेव्हा त्याने उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये तुम्ही समजू शकता, पण त्यांना ते समजणार नाही.

मत्तय 24:15

तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.

प्रकटीकरण 13:1

मग मी एक श्र्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुटहोते आणि प्रत्येक डोक्यावर देवनिंदाव्यंजक नाव लिहिले होते.

प्रकटीकरण 13:18

ज्या माणसाला समजबुद्धी आहे, त्याने त्या प्राण्याच्या संख्ये अर्थशोधावा. ही संख्या मनुष्यांची संख्या आहे. त्यांची संख्या आहे 666.

प्रकटीकरण 17:3

मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले. तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्र्वापदावर बसलेले पाहिले. त्याश्र्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती. त्या श्र्वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे होती,

प्रकटीकरण 17:7

मग देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मीतुला त्या स्त्रीचे आणि ती ज्या श्र्वापदावर बसली आहे, ज्याला सात डोकी व दहा शिंगे आहेत त्याचे रहस्य सांगतो.

प्रकटीकरण 17:18

जी स्त्री तू पाहिलीस ती मोठी नगरी आहे, जी पृथ्वीवरच्याराजांवर सत्ता गाजवील.”

Interlinear

Choose Theme