Home Bibles प्रकटीकरण 16:17 · मराठी बायबल
प्रकटीकरण 16:17 · मराठी बायबल

मग सातव्या देवदूताने त्याची वाटी हवेत ओतली. तेव्हा मंदिरातून सिंहासनाजवळून मोठा आवाज आला. तो म्हणाला,“हे पूर्ण झाले आहे.”

Cross references

दानीएल 12:7

“तागाचे कपडे परिधान केलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या राहिलेल्या माणसाने आपले, उजवा व डावा दोन्ही हात स्वर्गाकडे उंचावले आणि त्याने चिरंतर देवाची शपथ घेऊऩ वचन देताना मी ऐकले, तो म्हणाला तो काळ, एक वेळ, अनेक वेळा, (अ) आणि अर्धावेळेचा असेल. पवित्र लोकांच्या शक्तीचा बीमोड केला जाईल आणि मग या सर्व गोष्टी अखेरीला खऱ्या ठरतील.”

योहान 19:30

येशू आंब घेतल्यावर म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला.

इफिसकरांस 2:2

ज्यामध्ये तुम्ही पूर्वी जगत होता, जगातील दुष्ट मार्गाचे अनुकरण करीत होता, आणि आपल्याला न दिसणारे आध्यात्मिक सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्या सताधीशाचे अनुकरण करीत होता. जे देवाच्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये हाच आत्मा कार्य करीत आहे.

इफिसकरांस 6:12

कारण आपले झगडणे, रक्तमांसाबरोबर नाही, तर सताधीशांविरुद्ध, अधिकान्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या सामर्थ्याबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्यांविरुद्ध आहे.

प्रकटीकरण 10:6

जो अनंतकाळजगतो, ज्याने आकाश व त्यातील सर्व काही बनविले, पृथ्वी व तीवरील, त्याच्या नावाने शपथ वाहिली. आणि म्हणाला,“आता आणाखी विलंब होणार नाही!

प्रकटीकरण 11:15

सातव्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाले. ते आवाज म्हणाले:“जगाचे राज्य आता आमच्या प्रभुचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे. आणि तो अनंतकाळपर्यंत राज्य करील.”

प्रकटीकरण 11:19

मग देवाने स्वर्गातील मंदिर उघडले. तेव्हा तेथे कराराचा कोश दिसला आणि विजा चमकू लागल्या. गोंगाट, गडगडाट,भूकंप व गारांचे वादळ झाले.

प्रकटीकरण 14:15

मग आणखी एक देवदूत मंदिरामधून बाहेर आला वढगावर बसलेल्यास मोठ्याने म्हणाला, “तुझा विळा घे व (पृथ्वीवरुन) पीक गोळा कर, कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचेफळ पिकले आहे.”

प्रकटीकरण 14:17

मग दुसरा देवदूत स्वर्गातील मंदिरातून बाहेर आला. या देवदूताकडेसुद्धा धारदार विळा होता.

प्रकटीकरण 15:5

त्यानंतर मी स्वर्गामध्ये मंदिर (साक्षीचा मंडप)पाहिले. मंदिर उघडे होते.

प्रकटीकरण 16:1

मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्याओता.”

प्रकटीकरण 20:1

आणि मी एक देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला. त्याच्या हातात खोल बोगद्याची किल्ली आणि एक मोठासाखळदंड होता.

प्रकटीकरण 21:6

नंतर तो मला म्हणाला, “पूर्ण झाले आहे! मी अल्फा व ओमेगा, आरंभ व शेवट आहे. जो कोणी तहानेला आहे, त्यालामी जीवनी पाण्याच्या झऱ्यातील पाणी फुकट देईन.

Interlinear

Choose Theme