Home Bibles प्रकटीकरण 15:1 · मराठी बायबल
प्रकटीकरण 15:1 · मराठी बायबल

मग मी आणखी एक अदभुत चिन्ह स्वर्गात पाहिले. ते महान आणि चकित करणारे होते. तेथे सात देवदूतांनी सात पीडाआणल्या होत्या. या शेवटच्या पीडा होत्या कारण त्यानंतर देवाचा क्रोध नाहीसा होणार आहे.

Cross references

लेवीय 26:21

“तरी सुध्दा अद्याप तुम्ही माझ्याविरुद्ध वागाल व माझ्या आज्ञा पाळण्यास नकार द्याल तर मी तुम्हाला तुमच्या पापांच्या मानाने सातपट अधिक ताडण करीन! तुम्ही जेवढी अधिक पापे कराल तेवढी अधिक शिक्षा पावाल!

दानीएल 4:2

परात्पर देवाने माझ्यासाठी केलेले चमत्कार व विस्मयड्ढारक गोष्टी आपल्याला सांगताना मला आनंद होत आहे.

दानीएल 6:27

देव माणसांना मदत करतो व त्याचे रक्षण करतो. स्वर्गात व पृथ्वीवर तो विस्मयकारक चमत्कार करतो. देवानेच सिंहांपासून दानीएलाला वाचविले.”

दानीएल 12:6

तागाची वस्त्रे परिधान केलेला माणस नदीच्या पाण्यावर उभा होता. त्या दोघांतला एक त्याला म्हणाला, “ह्या विस्मयकारक गोष्टी खऱ्या व्हायला किती काळ लागेल?”

दानीएल 12:11

“‘नित्याची होमार्पणे करणे बंद होईल. ह्या वेळेपासून ती भयंकर नाश करणारी गोष्टी घेडेपर्यंतचा काळ हा 1290 दिवसांचा असेल.

मत्तय 13:41

मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व गोष्टी आणि अन्याय करणारे यांना बाजूला काढतील.

मत्तय 13:49

या काळाच्या शेवटी असेच होईल. देवदूत येतील आणि वाईटांना नितीमान लोकांतून वेगळे करतील.

प्रकटीकरण 8:2

आणि मी सात देवदूतांनादेवासमोर उभे असलेले पाहिले. त्यांना सात कर्णे दिले होते.

प्रकटीकरण 8:6

मग सात देवदूत त्यांचे कर्णे वाजविण्यास तयार झाले.

प्रकटीकरण 8:13

मी पाहत असताना, आकाशात उंचावर मी गरुडाला उडताना पाहिले. गरुड मोठ्या आवाजात म्हणाला, “संकट! संकट!संकट, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर संकट येत आहे. हे संकट तीन देवदूतांनी कर्णा वाजविल्यावर येईल.”

प्रकटीकरण 10:3

आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना कली. जेव्हा तो ओरडला, तेव्हा त्या सात मेघगर्जनांनी आपापले शब्दउच्चारले.

प्रकटीकरण 11:14

दुसरे मोठे संकट संपले. तिसरे मोठे संकट लवकरच येत आहे.

प्रकटीकरण 12:1

आणि मग एक अदभुत महान चिन्ह आकाशात दिसले. तेथे एक स्त्री होती. ती सूर्याचा पेहराव केलेली होती. चंद्र तिच्यापायाखाली होता. तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुगुट होता.

प्रकटीकरण 14:10

तो मनुष्य देवाच्यारागाच्या सर्व शक्तीनिशी बनवलेला द्राक्षारस पिईल. त्या व्यक्तीला पवित्र देवदूतांसमोर व कोकऱ्यासमोर जळत्या गंधकानेपीडले जाईल.

प्रकटीकरण 14:19

देवदूताने त्याचाविळा पृथ्वीवर चालवला. देवदूताने पृथ्वीची द्राक्षे गोळा केली आणि देवाच्या क्रोधाच्या घाण्यात टाकली.

प्रकटीकरण 15:6

आणि सात पीडा आणणारे सात देवदूतमंदिराबाहेर आले. त्यांनी स्वच्छ चमकदार तागाचे कपडे घातले होते. त्यानी त्यांच्या छातीवर सोन्याच्या पटृ्या बांधल्याहोत्या.

प्रकटीकरण 16:1

मग मी मंदिरातून एक मोठा आवाज ऐकला. तो सात देवदूतांना म्हणाला, “जा, पृथ्वीवर देवाच्या रागाच्या सात वाट्याओता.”

प्रकटीकरण 19:15

त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमवील,आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवील.

प्रकटीकरण 21:9

मग ज्या देवदूतांच्या हातात सात पीडांनी भरलेल्या सात वाट्या होत्या. त्यांच्यापैकी एक देवदूत आला, आणि तो मलाम्हणाला, “इकडे ये! जी कोकऱ्याची वधु आहे, ती मी तुला दाखवितो.”

Interlinear

Choose Theme