Home Bibles प्रकटीकरण 13:17 · मराठी बायबल
प्रकटीकरण 13:17 · मराठी बायबल

यासाठी की, चिन्ह असल्याशिवाय कोणीही व्यक्तीने विकू नये किंवा विकत घेऊ नये. हे चिन्ह म्हणजे त्याप्राण्याचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे.

Cross references

प्रकटीकरण 3:12

जोविजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा खांब बनवीन. तो पुन्हा कधीही त्याला सोडणार नाही. मी त्याच्यावरमाझ्या देवाचे नाव व माझ्या देवाच्या शहराचे नाव नवे यरुशलेम असे लिहीन. जे माझ्या देवापासून स्वर्गातून खाली येतआहे. आणि मी त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन.

प्रकटीकरण 13:16

दुसऱ्या प्राण्याने सर्व लोकांना - लहानमोठ्या, श्रीमंत आणि गरीब, स्वतंत्र व दास - बळजबरी केली की, त्यांनी त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपळावर चिन्हकरुन घ्यावे.

प्रकटीकरण 13:18

ज्या माणसाला समजबुद्धी आहे, त्याने त्या प्राण्याच्या संख्ये अर्थशोधावा. ही संख्या मनुष्यांची संख्या आहे. त्यांची संख्या आहे 666.

प्रकटीकरण 14:9

तिसरा देवदूत पहिल्या दोन देवदूतांच्या मागे गेला. तिसरा देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला: “जो माणूस प्राण्याची आणिप्राण्याच्या मूर्तीची उपासना करतो, त्याला त्याच्या कपाळावर किंवा हातावर प्राण्याची खूण करु देतो,

प्रकटीकरण 14:11

आणि त्यांच्या जळत्या वेदनांतून अनंतकाळसाठी धूर निघेल, जे लोक प्राण्याची उपासना करतात आणित्याच्या मूर्तीची उपासना करतात किंवा ज्यांना त्याच्या नावाचे चिन्ह आहे. त्यांना रात्र असो किंवा दिवस असो, विश्रांतिमिळणार नाही.”

प्रकटीकरण 15:2

मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्यानावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती.

प्रकटीकरण 17:5

तिच्या कपाळावर नाव लिहिले होते.त्या नावाला गुपित अर्थ आहे. त्यावर असे लिहीले होते:

प्रकटीकरण 22:4

आणि ते त्याचे मुख पाहतील. व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल.

Interlinear

Choose Theme