Home Bibles प्रकटीकरण 10:9 · मराठी बायबल
प्रकटीकरण 10:9 · मराठी बायबल

म्हणून मी त्या देवदूताकडे गेलो व मला ती लहान गुंडाळी दे असे म्हणालो. तो मला म्हणला, “ही घे, आणि ही खा. तीखाल्ल्याने तुझे पोट कडू होईल. पण तुझ्या तोंडाला मात्र ते मधासारखे गोड लागेल.”

Cross references

ईयोब 23:12

मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.

यिर्मया 15:16

मला तुझा संदेश मिळाला व मी तो खाल्ला (आत्मसात केला.) तुझ्या संदेशाने मला खूप आनंद झाला. तुझ्या नावाने ओळखले जाण्यात मला आनंद वाटतो कारण तुझे नावच ‘सर्वशक्तिमान परमेश्वर’ असे आहे.

यहेज्केल 2:8

“मानवपुत्रा, मी तुला ज्या गोष्टी सांगतो, त्या तू लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेस. त्या बंडखोर लोकांप्रमाणे माझ्याविरुद्ध जाऊ नकोस. तुझे तोंड उघड आणि माझे शब्द स्विकार कर. मग ते त्या लोकांना सांग. आता ते खाऊन टाक.”

यहेज्केल 3:1

देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू जे पाहतोस, ते खा. तो पट खा. मग त्या गोष्टी इस्राएलच्या लोकांना जाऊन सांग.”

यहेज्केल 3:14

वाऱ्याने मला उचलून दूर नेले. मी ती जागा सोडली. माझा आत्माफार खिन्न आणि दु:खी झाला होता. पण देवाची शक्ती मोठ्या प्रमाणात मला प्राप्त झाली होती.

कलस्सैकरांस 3:6

कारण या गोष्टींमुळे देवाचा राग ओढवणार आहे.

Interlinear

Choose Theme