Home Bibles प्रकटीकरण 1:10 · मराठी बायबल
प्रकटीकरण 1:10 · मराठी बायबल

प्रभूच्या दिवशी आत्म्याने माझा ताबा घेतला. माइया मागे मी एक मोठा आवाजऐकला. तो आवाज कर्ण्यासारखा ऐकू आला.

Cross references

मत्तय 22:43

त्यावर येशू त्यांना म्हणाला, मग दाविदाने त्याला प्रभु असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला,

योहान 20:19

आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी शिष्य होते तेथील दार यहूदी लोकांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहिला. त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांति असो.”

योहान 20:26

एक आठवड्यानंतर येशूचे शिष्य त्या घरामध्ये पुन्हा बसले होते व थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दार बंद होते तरी येशू आत आला व त्यांच्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो.”

प्रेषितांचीं कृत्यें 10:10

पेत्राला भूक लागली होती. त्याला खायला पाहिजे होते. ते पेत्रासाठी जेवण करीत असता पेत्राला तंद्री लागली.

प्रेषितांचीं कृत्यें 20:7

मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठीएकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.

1 करिंथकरांस 16:2

प्रत्येक रविवारी तुम्हांतील प्रत्येकाने आपल्या घरी, जो काही त्याला नफा मिळाला असेल त्यातून काढून ठेवावे आणि बचत करावी.

2 करिंथकरांस 12:2

ख्रिस्तामधील एक माणूस मला माहीत आहे जो चौदा वर्षा पूवी तिसऱ्या स्वर्गात घेतला गेला. तो शरीरात किंवा शरीराबाहेर घेतला गेला हे मला माहीत नाही, देव जाणतो.

प्रकटीकरण 4:1

तेव्हा मी पाहिले आणि स्वर्गात दार माझ्यासमोर उघडलेले दिसले. आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलतानाऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज कर्ण्याच्या आवाजासारखा होता. तो आवाज म्हणाला, “इकडे ये, आणिमी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.”

प्रकटीकरण 10:3

आणि त्याने सिंहाच्या गर्जनेसारखी मोठ्याने गर्जना कली. जेव्हा तो ओरडला, तेव्हा त्या सात मेघगर्जनांनी आपापले शब्दउच्चारले.

प्रकटीकरण 17:3

मग देवदूताने मला आत्म्याद्वारे वाळवंटात नेले. तेथे मी एका स्त्रीला किरमिजी रंगाच्या श्र्वापदावर बसलेले पाहिले. त्याश्र्वापदाच्या अंगावर वाईट नावे लिहिली होती. त्या श्र्वापदाला सात डोकी आणि दहा शिंगे होती,

प्रकटीकरण 21:10

मी आत्म्याने भरुन गेलो असता देवदूत मलाएका उंच पर्वतावर घेऊन गेला. आणि त्याने पवित्र नगर, यरुशलेम, स्वर्गातून देवापासून खाली उतरताना मला दाखविले.

Interlinear

Choose Theme