Home Bibles स्तोत्रसंहिता 89:49 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 89:49 · मराठी बायबल

देवा, तू पूर्वी दाखवलेले प्रेम कुठे आहे? तू दावीदला त्याच्या कुटुंबाशी इमान राखण्याचे वचन दिले होतेस.

Cross references

2 शमुवेल 3:9

आता मात्र मी निर्धाराने सांगतो की, देवाने भाकित केल्याप्रमाणे सर्व घडेल. शौलाच्या घराण्याकडून राज्य काढून घेऊन ते दावीदाकडे सोपवण्याचे भाकित परमेश्वराने केले आहे. परमेश्वर दावीदाला इस्राएल आणि यहूदा यांचा राजा करणार आहे. दानपासून बैर-शेब्यापर्यंत त्याचे राज्य असेल. माझ्या हातून आता हे सर्व प्रत्यक्षात आले नाही तर देव खुशाल माझे वाईट करो.”

2 शमुवेल 7:15

पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो तेव्हा तुझ्यासमोर मी त्याला दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही.

स्तोत्रसंहिता 49:8

स्व:तचे आयुष्य कायमचे विकत घेण्याइतका पैसा कुणाकडेच नसतो. सदैव जिवंत राहाण्याचा हक्‌ विकत घेण्याइतका.

स्तोत्रसंहिता 49:10

शहाणी माणसेही मूर्ख लोकांसारखीच मरतात. आणि इतर लोक त्यांची सर्व संपत्ती घेतात.

स्तोत्रसंहिता 54:5

जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल.

स्तोत्रसंहिता 77:9

देव दयेचा अर्थ विसरला का? त्याच्या कृपेचे आता रागात परिवर्तन झाले का?”

स्तोत्रसंहिता 89:3

देव म्हणाला, “मी निवडलेल्या राजाशी करार केला. मी दावीदला, माझ्या सेवकाला वचन दिले.

स्तोत्रसंहिता 89:35

माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.

स्तोत्रसंहिता 132:11

परमेश्वराने दावीदाला वचन दिले. परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले. राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.

यशया 55:3

मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल तुम्ही माझ्याकडे या. मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. हा करार मी दावीदबरोबर केलेल्या करारासारखा असेल. मी दावीदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन. तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता.

यशया 63:7

परमेश्वर कृपाळू आहे ह्याचे मी स्मरण ठेवीन. परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन. इस्राएलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या. परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे. परमेश्वराने आमच्यावर दया केली.

इब्री लोकांस 7:21

पण येशू जेव्हा याजक, बनला तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्याला सांगितले की,“प्रभूने शपथ वाहिली आहे, आणि तो आपले मत बदलणार नाही: ‘तू अनंतकाळचा याजक आहेस.’

Interlinear

Choose Theme