देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल. देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
Cross references
ते माझ्याशी आदराने वागले, माझ्या आज्ञा मनापासून पाळल्या तर त्यांचे व त्यांच्या वंशजांचे निरंतर कल्याण होईल. एवढेच मला त्यांच्याकडून हवे आहे.’
परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्याला खडकातून मध दिला, त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.
काही दिवसांनी तो तिच्याशी लग्न करायला परत जात असताना, त्या तरुण सिंहाचे कलेवर पाहायला वळला. त्याला त्याच्यावर मधमाश्यांनी पोळे केलेले दिसले. त्यात थोडा मधही होता.
सातव्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अशाप्रकारे पलिष्ट्यांना उत्तर मिळाले. ते शामशोनकडे येऊन म्हणाले.“मधापेक्षा मधुर ते काय? सिंहापेक्षा उग्र ते काय?”तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला.“तुम्ही माझी कालवड नांगराला जुंपली नसती तर तुम्हाला हे कोडे कधीच उलगडले नसते.”
लढत लढत लोक रानात शिरले. तिथे त्यांना जमिनीवर मधाचे पोळे दिसले पण ते पाहूनही लोकांनी त्यातील मधाला हात लावला नाही कारण शपथेचा धाक त्यांच्या मनात होता.
त्या दिवसांत माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलईत धूत असे. माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेले होती.
ते परदेशी गलितगात्र होतील. ते त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.
देवाने तुझ्या देशात शांती आणली. म्हणून युध्दात शत्रूंनी तुझे धान्य नेले नाही. आणि अन्न म्हणून तुझ्याकडे भरपूर धान्य आहे.
खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतुनच्या तेलाने भरून वाहतील.