सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, आमच्याकडे परत ये. आमचा स्वीकार कर. आम्हाला वाचव.
Cross references
“तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा.
पण आणखी एका गोष्टीबद्दल तू खंबीर आणि समर्थ असले पाहिजेस. माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळ. त्यांचे तंतोतंत पालन केलेस तर तू हाती घेतलेल्या सर्व कार्यात यशस्वी होशील.
मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला हे मागायचे आहे, “मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईनं.”
परमेश्वरा, माझ्यापासून असा दूर जाऊ नकोस. तुझ्या सेवकावर रागावू नकोस आणि दूर जाऊ नकोस. मला मदत कर! मला दूर लोटू नकोस. मला सोडू नकोस. देवा, तूच माझा तारणारा आहेस.
कृपा करुन तुझ्या सेवकाचे स्वागत कर आणि त्याचा स्वीकार कर. माझ्यावर दया कर आणि माझे रक्षण कर.
हा देश आमच्या वडिलांच्या तलवारीने मिळवलेला नाही. त्यांच्या कणखर बाहूंनी त्यांना विजयी केले नाही. हे घडले कारण तू त्यांच्या बरोबर होतास. देवा तुझ्या पराक्रमी शक्तीमुळे आमचे वाडवडील वाचले का? कारण तू त्यांच्यावर प्रेम केलेस.
इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक. तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस. राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस. आम्हाला तुला बघू दे.
देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
परमेश्वर पुढे म्हणाल, “इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही माझ्याशी विश्वसघात करता. पण माझ्याकडे परत या. माझ्याकडे परत या. जरी तुम्ही विश्वासघातकी असलात तरी मी तुम्हाला क्षमा करीन.”पण लोकांनी म्हणावे, “हो! आम्ही तुझ्याकडे येऊ तूच परमेश्वर आमचा देव आहेस!”
“‘यहूदातील आणि इस्राएलमधील लोकांबरोबर मी एक करार करीन. तो करार चिरंतन राहील. ह्या कराराप्रमाणे, मी ह्या लोकांकडे कधी पाठ फिरविणार नाही. मी त्यांच्याशी नेहमी चांगला वागेन. मी त्यांना माझा आदर करायची भावना देईन. मग ते माझ्यापासून कधीही दूर जाणार नाहीत.