Home Bibles स्तोत्रसंहिता 80:11 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 80:11 · मराठी बायबल

तिच्या वेली भूमध्य समुद्रापर्यंत पसरल्या, तिचे कोंब युफ्रेटसनदीपर्यंत गेले.

Cross references

उत्पत्ति 15:18

म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले व त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो;

निर्गम 23:31

“मी तुम्हाला तांबडा समुद्र ते थेट युप्रेटीस नदी एवढा सारा प्रदेश देईन; तुमची पश्चिमेकडील सीमा पलिष्ट्यांच्या समुद्रापर्यंत म्हणजे भूमध्यसमुद्रापर्यंत व पूर्वेकडील सीमा अरबी वाळवंटापर्यंत, अशा तुमच्या प्रदेशाच्या सीमा असतील. मी तुम्हाला तेथे राहाणाऱ्या लोकांचा पराभव करावयास लावीन व तुम्ही त्या सर्वाना तेथून घालवून द्याल.

1 राजे 4:21

युफ्राटिस नदीपासून पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत शलमोनाची सत्ता होती. मिसरच्या सीमेला त्याची हद्द भिडली होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत.

1 राजे 4:24

युफ्राटिस नदीच्या पश्र्चिमेकडील सर्व देशांवर त्याची सत्ता होती. तिफसाहापासून गज्जापर्यंतचा हा प्रदेश होय सर्वत्र शांतता नांदत होती.

1 इतिहास 18:3

हदरेजरच्या सैन्याशीही दावीद लढला. हदरेजर हा सोबचा राजा. दावीदाने त्या सैन्याशी हमाथ नगरापर्यंत दोन हात केले. हदरेजर आपल्या राज्याची सीमा फरात नदीपर्यंत वाढवू पाहात होता म्हणून दावीदाने हे केले.

स्तोत्रसंहिता 72:8

त्याचे राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि युफ्रेटस नदीपासून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यत वाढू दे.

Interlinear

Choose Theme