Home Bibles स्तोत्रसंहिता 73:20 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 73:20 · मराठी बायबल

परमेश्वरा, ते लोक म्हणजे झोपून उठल्यावर विसर पडणाऱ्या स्वप्रसारखे आहेत. आपल्या स्वप्रात येणाऱ्या राक्षसाप्रमाणे तू त्या लोकांना अदृष्य करशील.

Cross references

ईयोब 20:8

तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्याला घालवून देण्यात येईल आणि एखाद्या दु:स्वप्रासारखा तो विसरलाही जाईल.

स्तोत्रसंहिता 7:6

परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द लढ. परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.

स्तोत्रसंहिता 39:6

आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते. आपली सगळी संकटे निष्कारणच असतात. आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्यालामाहीत नसते.

स्तोत्रसंहिता 78:65

शेवटी आमचा प्रभु झोपेतून उठलेल्या माणसासारखा, खूप द्राक्षारस प्यायलेल्या सैनिकासारखा उठला.

स्तोत्रसंहिता 90:5

तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे. सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो. आम्ही गवतासारखे आहोत.

यशया 29:7

अनेक राष्ट्रे अरीएलविरूध्द लढली. ते सर्व रात्रीच्या दु:स्वप्नासारखे होते. सैन्यांनी अरीएलला वेढा घातला आणि शिक्षा केली.

Interlinear

Choose Theme