Home Bibles स्तोत्रसंहिता 68:31 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 68:31 · मराठी बायबल

त्यांना मिसरमधून संपत्ती आणायला सांग देवा, इथिओपियातल्या लोकांना त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणायला भाग पाड.

Cross references

1 राजे 8:22

एवढे बोलून शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला. सर्व लोक त्याच्या समोर होते. दोन्ही हात आकाशाच्या दिशेन पसरुन वर पाहात

स्तोत्रसंहिता 44:20

आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो का? आम्ही परक्या देवाची प्रार्थना केली का? नाही.

स्तोत्रसंहिता 72:8

त्याचे राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत आणि युफ्रेटस नदीपासून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यत वाढू दे.

स्तोत्रसंहिता 88:9

अति द:ुखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.

स्तोत्रसंहिता 143:6

परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझी प्रार्थना करतो. तहानेली जमीन जशी पावसाची वाट बघते तशी मी तुझ्या मदतीची वाट बघत आहे.

यशया 19:18

ह्या वेळेला मिसरमधील पाच शहंरातील लोक युहद्यांची कनान भाषा बोलतील. त्या पाच शहरांपैकी एका शहराचे नाव “ईर-हरेस” असेल.ह्या शहरांत राहणारे लोक सर्व शक्तिमान परमेश्वरला अनुसरण्याची शपथ वाहतील.

यशया 45:14

परमेश्वर म्हणतो, “मिसर आणि इथिओपिआ श्रीमंत आहेत. पण इस्राएल, तुला ती संपत्ती मिळेल. सेबाचे उंच लोक तुझ्या मालकीचे होतील. ते गळ्यात साखळ्या अडकविलेल्या अवस्थेत तुझ्यामागून चालतील (म्हणजेच ते तुझे गुलाम होतील) ते तुझ्यापुढे वाकतील आणि तुझी विनवणी करतील.” इस्राएल, देव तुझ्या बरोबर आहे दुसरा कोणीही देव नाही.

यशया 60:6

मिद्यान आणि एफा येथील उंटाचे कळप तुझी भूमी ओलांडतील. शेबातून उंटाची रीघ लागेल. ते सोने आणि सुंगधी द्रव्ये आणतील. लोक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गातील.

यशया 66:19

काही लोकांवर मी खूण करीन. मी त्यांना वाचवीन. मी ह्या वाचविलेल्या काही लोकांना तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तूबल, यवान आणि दूरूदरच्या देशांत पाठवीन. त्या लोकांनी कधीच माझी शिकवण ऐकलेली नाही. त्यांनी कधीच माझे तेज पाहिलेले नाही म्हणून वाचविले गेलेले लोक, त्या राष्ट्रांना माझ्या तेजाबद्दल सांगतील.

सफन्या 3:10

कूश देशातील नदीपलीकडचे लोकसुध्दा येतील. माझी विखुरलेली माणसे मला शरण येतील. माझी उपासना करणारे मला वाहण्यासाठी काही गोष्टी घेऊन येतील.

प्रेषितांचीं कृत्यें 8:27

मग फिलिप्प तयार झाला व गेला. रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता. तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता. तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता.

Interlinear

Choose Theme