Home Bibles स्तोत्रसंहिता 66:12 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 66:12 · मराठी बायबल

तू आमच्या शत्रूंना आमच्यावरुन चालू दिलेस. तू आम्हाला पाण्यातून आणि आगीतून फरफटत नेलेस. परंतु तू आम्हाला सुरक्षित ठिकाणी आणलेस.

Cross references

2 शमुवेल 15:17

राजा आणि त्याच्यामागोमाग सर्व लोक निघून गेले. अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले

ईयोब 5:19

देव तुला सहा प्रकारच्या संकटांतून तारील. आणि सात संकटांत तुला काहीही अपाय होणार नाही.

ईयोब 36:16

“ईयोब, देवाला तुला मदत करायची इच्छा आहे. तू तुझ्या दु:खातून बाहेर पडावेस असे देवाला वाटते. तुझे आयुष्य साधे सरळ असावे अशी त्याची इच्छा आहे. तुझ्या जेवणाच्या टेबलावर अन्नाची रेलचेल असावी असे त्याला वाटते.

स्तोत्रसंहिता 33:19

देव त्यांना मरणापासून वाचवतो ते भुकेले असतील तेव्हा त्यांना तो शक्ती देतो.

स्तोत्रसंहिता 40:2

परमेश्वराने मला विनाशाच्याखड्‌यातून उचलले. त्याने मला चिखलातून बाहेर काढले. त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले, त्याने माझे पाय स्थिर केले.

स्तोत्रसंहिता 107:35

देवाने वाळवंटाचे पाण्याची तळी असलेल्या जमिनीत रुपांतर केले. देवाने कोरड्या जमिनीतून पाण्याचे झरे वाहायला लावले.

स्तोत्रसंहिता 129:1

“मला आयुष्यभर खूप शत्रू होते.” इस्राएल, आम्हाला त्या शंत्रूंबद्दल सांग.

यशया 35:6

पंगु हरणांप्रमाणे नाचतील. मुके आनंदगीते गाऊ लागतील. वाळवंटात झरे वाहू लागतील, तेव्हा असे होईल. कोरड्या जमिनीतून झरे वाहतील.

यशया 43:1

याकोब, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएल, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस.

यशया 43:2

जेव्हा तू अडचणीत असतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही. आगीमधून चालताना तुला भाजणार नाही. ज्वाळा तुला पोळणार नाहीत.

यशया 51:23

आता तुला ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर मी माझा राग काढीन व त्यांना शिक्षा करीन. त्या लोकांनी तुला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ते तुला म्हणाले, ‘आमच्यापुढे वाक. आम्ही तुला तुडवून जाऊ.’ त्यांनी बळजबरीने तुला वाकविले आणि माती तुडवल्याप्रमाणे ते तुझ्या पाठीवरून चालले. तू जणू काही त्यांचा रस्ता होतीस.”

दानीएल 3:26

मग नबुखद्नेस्सर तापलेल्या भट्टीच्या तोंडाजवळ गेला. तो ओरडला,’ शद्रख, मेशख, अबेद्नगो, बाहेर या. परात्पर देवाच्या सेवकांनो, इकडे या. मग ती तिघे आगीतून बाहेर आले.

लूक 16:25

परंतु अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, लक्षात ठेव की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजाराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता येथे तो समाधानात आहे व तू दू:खात आहेस.

प्रेषितांचीं कृत्यें 14:22

आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दु:खांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”

1 थेस्सलनीकाकरांस 3:3

यासाठी की, सध्या होणाऱ्या छळामुळे तुम्ही कोणी अस्वस्थ होऊ नये. कारण तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे की, यासाठीच आमची दैवी नेमणूक झाली आहे.

याकोब 5:11

त्यांनी दु:ख सहन केले म्हणून आपण त्यांना धन्य समजतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि तुम्हांला माहीत आहे की, प्रभूने ईयोबाच्या वतीने त्याचा शेवट कसा केला. प्रभु दयाळू आणि खूप कनवाळू आहे, ह्या गोष्टीचे त्याने प्रात्यक्षिक दाखविले.

प्रकटीकरण 7:14

मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतलीआहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत.

Interlinear

Choose Theme