Home Bibles स्तोत्रसंहिता 64:3 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 64:3 · मराठी बायबल

त्यांनी माझ्याबद्दल अगदी वाईट खोटं सांगितलं आहे. त्यांच्या जिभा धारदार तलवारी सारख्या आहेत. त्यांचे कटू शब्द बाणाप्रमाणे आहेत.

Cross references

स्तोत्रसंहिता 11:2

दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात. ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात. ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्दयात सरळ सोडतात.

स्तोत्रसंहिता 57:4

माझे जीवन संकटात आहे, माझ्याभोवती माझे शत्रू आहेत. ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.

स्तोत्रसंहिता 58:7

ते लोक वाहून जाणाऱ्या पाण्याप्रमाणे नाहीसे होवोत. ते रस्त्यातल्या गवताप्रमाणे तुडवले जावोत.

स्तोत्रसंहिता 141:9

वाईट लोक माझ्यासाठी सापळे रचतात. मला त्यांच्या सापळ्यात पडू देऊ नकोस त्यांना मला पकडू देऊ नकोस.

नीतिसूत्रे 12:18

जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर ते शब्द तलवारीसारखे लागतात. पण शहाणा माणूस काळजी पूर्वक बोलतो. त्याचे शब्द दु:खावर फुंकर मारतात.

नीतिसूत्रे 30:14

असे काही लोक असतात ज्यांचे दात तलवारीसारखे असतात त्यांचे जबडे सुरी सारखे असतात. ते गरीबांकडून सर्व काही हिसकावण्यात त्यांचा वेळ खर्ची घालतात.

यशया 54:17

“लोक तुझ्याविरूध्द लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील. पण ती शस्त्रे तुझा पराभव करणार नाहीत. काही लोक तुझ्याविरूध्द बोलतील पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल.”देव म्हणतो, “देवाच्या सेवकांना काय मिळेल? त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील.”

यिर्मया 9:3

“ते त्यांच्या जिभा धनुष्यासारख्या वापरतात. त्यातून खोट्याचे बाण उडतात. ह्या भूमीवर, सत्य नव्हे, तर असत्य, खोटे बलवान झाले आहे, हे लोक एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात. त्यांना माझे ज्ञान नाही.” परमेश्वर असे म्हणाला आहे.

याकोब 3:6

होय, जीभ ही ज्वाला आहे. आपल्या शरीराच्या सर्व अवयवामध्ये वाईट गोष्टींची ती खाणच आहे. जीभ ही आपल्या सर्व शरीराला विटाळविणारी आहे. ती आपल्याला अपवित्र करते. आपल्या सर्व अस्तित्वालाच ती आग लावते. ती तरकाच्या ज्वालांनी जीवन पेटवते.

Interlinear

Choose Theme