Home Bibles स्तोत्रसंहिता 51:16 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 51:16 · मराठी बायबल

तुला बळी नको आहेत. तुला नको असणारे बळी मी देणार नाही.

Cross references

निर्गम 21:14

परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या माणसाला ठार मारले तर मात्र त्याला शिक्षा करावी; त्याला वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.

गणना 15:27

“पण जर फकत एकाच माणसाने चूक केली तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल.

गणना 15:30

पण जर एखाद्याने पाप केले आणि आपण चूक करीत आहो हे त्याला कळत असले, तर तो माणूस परमेश्वराविरुद्ध आहे. त्या माणसाला त्याच्या लोकांपासून वेगळे काढून टाकले पाहिजे. इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या माणसासाठी किंवा तुमच्यात राहणाऱ्या परदेशी माणसासाठी सारखाच नियम आहे.

गणना 35:31

जर एखादा माणूस खुनी असेल तर त्याला मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका. त्या खुन्याला मारलेच पाहिजे.

अनुवाद 22:22

“एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलमधून या दुराचाराचे निमूर्लन करावे.

1 शमुवेल 15:22

पण शमुवेल म्हणाला, “परमेश्वर जास्त प्रसन्न कशामुळे होईल? यज्ञ आणि होमार्पणे देऊन की त्याच्या आज्ञा पाळल्याने? त्याच्यासाठी यज्ञ करण्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळणे केव्हाही श्रेयस्कर. मेंढराची चरबी त्याला वाहण्यापेक्षा त्याचे ऐकणे चांगले.

2 शमुवेल 12:9

असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस आणि त्याच्या बायकोचा स्वत:ची बायको म्हणून स्वीकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास.

स्तोत्रसंहिता 40:6

परमेश्वरा, हे समजून घ्यायला तू मला मदत केलीस.तुला बळी किंवा धान्याच्या भेटी नको असतात. होमार्पणे किंवा पापार्पणे तुला नको असतात.

स्तोत्रसंहिता 50:8

मी तुमच्या होमबलीं बद्दल तक्रार करीत नाही. इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही तुमची होमार्पणे माझ्याकडे केव्हाही आणा. तुम्ही मला ती रोज द्या.

स्तोत्रसंहिता 51:6

देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.

स्तोत्रसंहिता 71:15

तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन, तू जेव्हा जेव्हा मला वाचवलेस त्याबद्दलही मी सांगेन. ते प्रसंग मोजता न येण्याइतके अगणित होत.

नीतिसूत्रे 15:8

दुष्ट माणसे ज्या गोष्टी अर्पण करतात त्या परमेश्वराला आवडत नाहीत. पण परमेश्वर चांगल्या माणसाची प्रार्थना ऐकून आनंदी होतो.

नीतिसूत्रे 21:27

वाईट लोक जेव्हा, त्याला बळी अर्पण करतात तेव्हा परमेश्वर आनंदी नसतो. खास करुन त्यावेळी, ज्यावेळी वाईट लोक त्याच्याकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतात.

यशया 1:11

देव म्हणतो, “तुम्ही माझ्यापुढे सतत यज्ञबलि का करता? मला तुमच्या मेंढ्यांच्या, वासरांच्या चरबीच्या, आणि बैल, कोकरे आणि बकऱ्यांच्या यज्ञबलिंचा आता वीट आला आहे.

यिर्मया 7:22

मी तुमच्या पूर्वजांना मिसरमधून बाहेर आणले. मी त्यांच्याशी बोललो. पण अर्पण करण्याच्या गोष्टींबद्दल व बळींबद्दल मी त्यांना आज्ञा दिली नाही.

यिर्मया 7:27

“यिर्मया, यहूदाच्या लोकांना तू ह्या सर्व गोष्टी सांग पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना बोलाविलेस तरी ते तुला ओ देणार नाहीत.

होशेय 6:6

का? कारण मला निष्ठावंत प्रेम पाहिजे, बळी नको. लोकांनी होमार्पणे आणण्यापेक्षा, परमेश्वराला जाणून घ्यावे असे मला वाटते.

आमोस 5:21

“मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक-सभा मला आवडत नाहीत.

इब्री लोकांस 10:5

म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला, “तुला यज्ञ किंवा अर्पणे नको होती, पण तू माझ्यासाठी शरीर तयार केले.

Interlinear

Choose Theme