Home
Bibles
Bible Study with Steffi
स्तोत्रसंहिता 47 · मराठी बायबल
||
Aa
स्तोत्रसंहिता
Chapter 47
मराठी बायबल
1
लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा.
2
सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.
3
त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली. त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.
4
देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली. त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.
5
परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासानाकडे जातो.
6
देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
7
देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा.
8
देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
9
देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात. सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत. देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे.
Back to language index
Choose Theme