Home Bibles स्तोत्रसंहिता 41:11 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 41:11 · मराठी बायबल

परमेश्वरा, माझ्या शत्रूंना मला दु:ख द्यायला संधी देऊ नकोस. तरच मला कळेल की तू माझा स्वीकार केला आहेस.

Cross references

स्तोत्रसंहिता 13:4

जर तसे घडले तर माझा शत्रू म्हणेले, “मी त्याच्यावर विजय मिळवला” माझ्या शत्रूने जर माझा पराभव केला तर तो खूष होईल.

स्तोत्रसंहिता 25:2

देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि माझी निराशा होणार नाही. माझे शत्रू मला हसणार नाहीत.

स्तोत्रसंहिता 31:8

तू माझ्या शत्रूंना मला घेऊन जाऊ देणार नाहीस तू मला त्यांच्या सापळ्यातून मुक्त करशील.

स्तोत्रसंहिता 35:25

“आम्हाला हवे होते ते मिळाले,” असे त्या लोकांना म्हणू देऊ नकोस. परमेश्वरा, “आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस.

स्तोत्रसंहिता 86:17

देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव. माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील. तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.

स्तोत्रसंहिता 124:6

परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपल्या शत्रूंना आपल्याला पकडू दिले नाही आणि ठार मारु दिले नाही.

स्तोत्रसंहिता 147:11

जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो. जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.

यिर्मया 20:13

परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर गरिबांचे रक्षण करतो. तो दुष्टापासून त्यांना वाचवितो.

कलस्सैकरांस 2:15

त्याने स्वत: वधस्तंभाद्वारे सत्ता आणि अधिकार हाणून पाडून त्यांवर विजय मिळविला आहे.

Interlinear

Choose Theme