Home Bibles स्तोत्रसंहिता 40:17 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 40:17 · मराठी बायबल

प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.

Cross references

स्तोत्रसंहिता 34:4

मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले.

स्तोत्रसंहिता 34:6

या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली.

स्तोत्रसंहिता 35:27

काही लोकांना माझे चांगले व्हावे असे वाटते. ते सर्व लोक सुखी होवोत ते लोक नेहमी म्हणतात, “परमेश्वर महान आहे त्याच्या सेवकाचे भले व्हावे अशी त्याची इच्छा आहे.”

स्तोत्रसंहिता 40:5

परमेश्वरा, देवा तू खरोखरच आश्र्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस. परमेश्वरा, तुझ्यासारखा कुणीही नाही. तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन, मोजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत.

स्तोत्रसंहिता 54:4

पाहा, माझा देव मला मदत करेल. माझा मालक मला साहाय्य करेल.

स्तोत्रसंहिता 69:33

परमेश्वर गरीबांचे, दीनांचे ऐकतो परमेश्वराला तुरुंगातले लोक अजूनही आवडतात.

स्तोत्रसंहिता 70:5

मी गरीब आणि असहाय्य माणूस आहे. देवा, लवकर ये आणि मला वाचव. देवा, फक्त तूच माझी सुटका करु शकतोस. उशीर करु नकोस.

स्तोत्रसंहिता 86:1

मी गरीब, असहाय्य माणूस आहे. परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.

स्तोत्रसंहिता 109:22

खी आहे आणि माझे ह्दयविदीर्ण झाले आहे.

स्तोत्रसंहिता 143:7

परमेश्वरा, त्वरा करुन मला उत्तर दे. माझा धीर आता सुटला आहे. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला मरु देऊ नकोस आणि थडग्यात पडलेल्या मेलेल्या माणसांप्रमाणे मला होऊ देऊ नकोस.

यशया 25:9

तेव्हा लोक म्हणतील, “हा आपला देव आहे. आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा. तो आपले रक्षण करायला आला आहे. आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत, म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.”

यशया 41:17

“गरीब आणि गरजू पाण्याचा शोध घेतात. पण त्यांना पाणी मिळू शकत नाही. ते तहानेलेले आहेत. त्यांच्या तोंडाला कोरड पडली आहे. मी त्यांनी केलेली आळवणी ऐकेन. मी इस्राएलचा देव, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

यशया 50:7

परमेश्वर माझा प्रभु मला मदत करील. म्हणूनच लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही. मी भक्कम होईन. माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे.

मत्तय 8:20

येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना राहायला बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावयास जागा नाही.”

2 करिंथकरांस 8:9

कारण तुम्हांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा माहीत आहे की, जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्याकरिता तो गरीब झाला, यासाठी की, त्याच्या गरीबीने तुम्ही श्रीमंत व्हावे.

इब्री लोकांस 13:6

म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो“देव माझा साहायकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?” स्तोत्र. 118:6

याकोब 2:5

माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका! देवानेच जगाच्या दृष्टिकोनातून गरीब असले त्यांना विस्वासात श्रीमंत होण्यासाठी निवडले नाही काय, आणि जे त्याच्यावर प्रीति करतात त्यांना देवरोज्याचे वारस म्हणून निवडण्याचे अभिवचन दिले नाही का?

1 पेत्र 2:23

जेव्हा लोकांनी त्याचा अपमान केला तेव्हा त्याने उलट अपमान केला नाही. जेव्हा त्याने दु:ख सहन केले तेव्हा त्याने धमकी दिली नाही. परंतु जो न्यायाने निवाडा करतो त्या देवाच्या हाती स्वत:ला सोपवून दिले.

1 पेत्र 5:7

तुमच्या सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो,

प्रकटीकरण 22:20

जो येशू या गोष्टीविषयीसाक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.”आमेन, ये प्रभु येशू, ये!

Interlinear

Choose Theme