परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो. परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो.
Cross references
सज्जनांना तो आधार देतो. त्यांना लटपटू देत नाही. पण दुर्जनांचा संहार करतो. त्यांना गर्तेत ढकलतो दुर्जनांचे बळ अशा वेळी कुचकामी ठरते.
उद्या सकाळी लौकर उठून तू आणि तुझ्या बरोबरची माणसे परत जा. तुम्हाला दिलेल्या नगरात जा. या सरदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष कर. तू भला माणूस आहेस उद्या उजाडताच निघून जा.”
मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.
मी तू आखून दिलेल्या मार्गांवरुन गेलो. माझ्या पायांनी जगण्याचा तुझा मार्ग कधीही सोडला नाही.
परमेश्वराने मला विनाशाच्याखड्यातून उचलले. त्याने मला चिखलातून बाहेर काढले. त्याने मला उचलले आणि खडकावर ठेवले, त्याने माझे पाय स्थिर केले.
परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले. माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे. बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील. ते देवाची उपासना करतील, ते देवावर विश्वास ठेवतील.
देवाच्या समोर चांगुलपणा जाईल आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील. 14
परमेश्वरा, मी जर नेहमी तुझे नियम पाळले.
परमेश्वरा, कबूल केल्याप्रमाणे मला मार्गदर्शन कर. माझे काहीही वाईट होऊ देऊ नकोस.
देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही.
परमेश्वरा तुला जाण्या - येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील.
युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक त्याला आनंद देत नाहीत.
तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग.
काही लोक नीट वजन न करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो.
जे लोक आनंदाने दुष्टपणा करतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो. पण जे लोक योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल परमेश्वर आनंदी असतो.
माणूस त्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याबद्दलच्या योजना करु शकतो. पण काय घडेल ते मात्र परमेश्वरच ठरवतो.
पण कोणाला बढाईच मारायची असेल तर त्याला ह्या गोष्टीसाठी मारु द्या. तो मला ओळखायला शिकला म्हणून बढाई मारु द्या. मी परमेश्वर आहे, मी कृपाळू व न्यायी आहे, जगात चांगल्या गोष्टी मी करतो आणि त्या गोष्टी मला आवडतात हे कळल्याबद्दल त्याला बढाई मारु द्या.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
परमेश्वरा, माणसाच्या आयुष्यावर त्याचा स्वत:चा खरा हक्क नसतो, हे मला माहीत आहे. लोक भविष्याच्या योजना खरोखरच ठरवू शकत नाहीत.
आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका. कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.