Home Bibles स्तोत्रसंहिता 37:2 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 37:2 · मराठी बायबल

वाईट लोक चटकन पिवळ्या पडणाऱ्या आणि मरुन जाणाऱ्या गवतासारखे व हिरव्या वनस्पती सारखे असतात.

Cross references

ईयोब 14:2

माणसाचे आयुष्य फुलासारखे आहे. तो लवकर वाढतो आणि मरुन जातो. माणसाचे आयुष्य छायेसारखे आहे. ती थोडा वेळ असते आणि नंतर नाहीशी होते.

स्तोत्रसंहिता 37:35

मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा दुष्टमाणूस पाहिला होता.

स्तोत्रसंहिता 73:17

मी देवाच्या मंदिरात गेलो आणि नंतर मला कळले.

स्तोत्रसंहिता 90:5

तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे. सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो. आम्ही गवतासारखे आहोत.

स्तोत्रसंहिता 92:7

वाईट लोक तणाप्रमाणे जगतात आणि मरतात. ते ज्या कवडीमोलाच्या गोष्टी करतात, त्या गोष्टींचा कायमचा नाश होतो.

स्तोत्रसंहिता 92:8

परंतु परमेश्वरा, तुला सदैव मान मिळेल.

स्तोत्रसंहिता 129:5

जे लोक सियोनचा तिरस्कार करीत होते, त्यांचा पराभव झाला. त्यांनी लढणे थांबवले आणि ते पळून गेले.

स्तोत्रसंहिता 129:6

ते लोक छपरावरच्या गवतासारखे होते. ते गवत वाढण्या आधीच मरुन जाते.

नीतिसूत्रे 24:20

या दुष्ट लोकांना आशा नसते. त्यांचा प्रकाश काळोख होईल.

याकोब 1:10

आणि श्रीमंत बंधूने देवाने त्याला दीनतेत आणले याचा अभिमान बाळगावा. कारण तो एखाद्या रानफुलासारख नाहीसा होतो.

1 पेत्र 1:24

म्हणून पवित्र शास्त्र सांगते,“सर्व लोक गवतासारखे आहेत आणि त्यांचे सर्व वैभव गवतातील रानफुलासारखे आहे. गवत सुकते, फूल गळून पडते,

Interlinear

Choose Theme