परमेश्वरा जे तुला खरोखरच ओळखतात त्यांच्यावर प्रेम करणे तू चालूच ठेव. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी तुझा चांगुलपणा असू दे.
Cross references
परमेश्वरा, माझा निवाडा कर. मी बरोबर आहे हे सिध्द कर मी निरपराध आहे हे सिध्द कर.
ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले, तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.
म्हणून परमेश्वर मला माझे फळ देईल. का? कारण मी निरपराध आहे. देव पाहातो की मी काहीच चूक करीत नाही म्हणून तो माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करील.
परमेश्वर त्याच्या माणसांना सोडून जाणार नाही. तो त्याच्या माणसांना मदत केल्याशिवाय सोडून जाणार नाही.
जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो. देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.
परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या पार्थनेकडे लक्ष दे आणि नंतर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. तू खरोखरच चांगला आणि निष्ठावान आहेस हे मला दाखव.
याकोबच्या वंशजांनो, या आपण परमेश्वराच्या प्रकाशातून चालू या.
वर स्वर्गाकडे पाहा, खाली पृथ्वीवर तुमच्या सभोवती पाहा. धुक्याच्या ढगाप्रमाणे आकाश नाहीसे होईल. पृथ्वी वृध्द होईल. पृथ्वीवरची माणसे मरतील, पण माझे तारण अनंत कालापर्यंत चालू राहील. माझ्या चांगुलपणाला अंत नाही.
योशीयाने गरीब व गरजू अशा लोकांना मदत केली. त्यामुळे त्यांचे सर्व व्यवस्थित झाले. यहोयाकीम, ‘देवाला ओळखणे ह्याचा अर्थ काय?’ ह्याचा अर्थ योग्य रीतीने जगणे व न्यायीपणाने वागणे. मला ओळखणे ह्याचा अर्थ हाच होय. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
मला ओळखण्याची इच्छा मी त्यांच्यात निर्माण करीन. मग मी परमेश्वर आहे हे त्यांना समजेल. ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन. बाबेलमधील हे सर्व कैदी अंत:करणापासून माझ्याकडे परत आले आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी हे करीन.
खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देईल. परमेश्वर म्हणतो, “लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील. तुमची निष्ठ मी कायमची सांभाळीन.
जशी पित्याने माझ्यावर प्रीति केली आहे तशीच मीही तुम्हांवर प्रीति केली आहे. माझ्या प्रीतीत राहा.
आणि अनंतकाळचे जीवन हेच की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.
मी सुयुद्ध जिंकेले आहे. मी माझी शर्यत संपविली आहे. मी विश्वास राखला आहे.
तुमच्या प्रभूला ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या बंधूला अथवा आपल्या देशबांधवाला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.
आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याने तुमचे रक्षण केले आहे.