Home Bibles स्तोत्रसंहिता 35:14 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 35:14 · मराठी बायबल

मी त्या लोकांसाठी सुतकी कपडे घातले. मी त्या लोकांना माझ्या मित्रांसारखे किंवा भावासारखेवागवले. आई मेल्यावर रडणाऱ्या माणसाप्रमाणे मी दु:खी आहे. त्या लोकांसाठी दु:ख व्यक्त करायचे म्हणून मी काळे कपडे घातले. दुखात नतमस्तक होऊन मी वावरलो.

Cross references

उत्पत्ति 24:67

6मग इसहाकाने मुलीला आपल्या आईच्या तंबूत आणले; त्या दिवशी रिबका त्याची बायको झाली; इसहाकाचे रिबकेवर फार प्रेम जडले; त्यामुळे आपल्या आईच्या मरणानंतर रिबकेमुळे त्याला समाधान मिळाले.

2 शमुवेल 1:11

हे ऐकून दावीदाला इतके दु:ख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याचे अनुसरण केले.

2 शमुवेल 1:17

शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक शोकपूर्ण गीत म्हटले.

स्तोत्रसंहिता 38:6

मी धनुष्यासारखा वाकलो आहे आणि मी दिवसभर उदास असतो.

लूक 19:41

जेव्हा तो जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला. आणि म्हणाला,

प्रेषितांचीं कृत्यें 16:28

इतक्यात पौल ओरडला, “स्वत:ला इजा करुन घेऊ नकोस आम्ही सर्व येथेच आहोत!”

Interlinear

Choose Theme