Home Bibles स्तोत्रसंहिता 33:20 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 33:20 · मराठी बायबल

म्हणून आपण परमेश्वरासाठी थांबू. तो आपली मदत आणि ढाल आहे.

Cross references

1 इतिहास 5:20

मनश्शे, रऊबेन आणि गाद वंशातील लोक लढाईच्या वेळी देवाची प्रार्थना करीत. देवावर भरवंसा असल्यामुळे ते मदतीची याचना करीत. देव त्यांना साहाय्य करी. त्यामुळे त्यांना हग्री लोकांचा पराभव करता आला. या लोकांबरोबरच्या इत्तर लोकांचाही त्यांनी पाडाव केला.

स्तोत्रसंहिता 27:14

परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.

स्तोत्रसंहिता 62:1

देवाने माझा उध्दार करावा म्हणून मी धीराने वाट पहात आहे. माझे तारण त्याच्याकडूनच येते.

स्तोत्रसंहिता 62:5

मी अगदी धीर धरुन देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे. देव माझी एकुलती एक आशा आहे.

स्तोत्रसंहिता 115:9

इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा. परमेश्वरच त्यांची शक्ती आणि ढाल आहे.

स्तोत्रसंहिता 130:5

मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे. माझा आत्मा त्याची वाट बघत आहे. परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.

स्तोत्रसंहिता 144:1

परमेश्वर माझा खडक आहे. परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वर मला युध्दाचे शिक्षण देतो. परमेश्वर मला लढाईसाठी तयार करतो.

यशया 8:17

तो करार असा:परमेश्वराने आपल्याला मदत करावी म्हणून मी वाट पाहीन. याकोबच्या वंशजांची परमेश्वराला लाज वाटते. तो त्यांच्याकडे पाहण्याचे नाकारतो. पण मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन. तो आम्हाला वाचवील.

यशया 25:9

तेव्हा लोक म्हणतील, “हा आपला देव आहे. आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा. तो आपले रक्षण करायला आला आहे. आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत, म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.”

यशया 40:31

पण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, ज्याप्रमाणे गरूड पंख पसरून वर उडतात, त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात. ही माणसे न दमता धावतात व न थकता चालतात.

Interlinear

Choose Theme