परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले. त्याला सर्व लोक दिसले.
Cross references
जिकडे तिकडे हिसांचार चालू होते; लोक वाईट व क्रूर झाले होते; त्यांनी पृथ्वीवर आपल्या जीवनाचा नाश करुन घेतला होता.
अखिल पृथ्वीवर कोणाची आपल्यावर श्रध्दा आहे याचा शोध परमेश्वराची नजर सतत घेत असते व अशांना तो आपले पाठबळ देतो. पण आसा, तू मात्र मूर्खपणा केला आहेस. तेव्हा यापुढे तुला लढायांना तोंड द्यावे लागेल.
कवडीमोलाचा कोण आहे ते देवाला माहीत आहे. तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्याच्या लक्षात राहातात.
देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते. त्याला आकाशाखालचे सर्व काही दिसते.
परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो. तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.
परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.
देव खरोखच स्वर्गात आहे आणि तो आपल्यावर नजर ठेवतो. देवाला शोधणाऱ्या शहाण्या लोकांच्या शोधात देव आहे.
देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही.
परमेश्वर त्या वरच्या पवित्र जागेतून खाली पाहील. परमेश्वर स्वर्गातून खाली पृथ्वीकडे पाहील.
सगळीकडे काय चालले आहे ते परमेश्वर बघतो. परमेश्वर सगळ्या माणसांना बघत असतो. चांगल्या आणि वाईट.
हा परमेश्वराचा संदेश आहे, “मी देव येथे आहे पण मीच देव दूरवरच्या स्थळीही असतो.”
परमेश्वरा, तू आपली नजर खाली वळवून आमच्याकडे पाही पर्यंत मी रडतच राहीन. तू स्वर्गातून आमच्याकडे लक्ष देईपर्यंत मी शोक करीन.
आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत.