Home Bibles स्तोत्रसंहिता 31:20 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 31:20 · मराठी बायबल

वाईट लोक चांगल्या माणसांना त्रास देण्यासाठी एकत्र येतात. ते दुष्ट लोक भांडणे सुरु करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तू चांगल्या लोकांना लपवतोस आणि त्यांचे रक्षण करतोस. तू त्यांचे तुझ्या निवाऱ्यात रक्षण करतोस.

Cross references

निर्गम 18:11

परमेश्वर सर्व देवांहून महान आहे हे आता मला कळाले, कारण इस्राएल लोकापेक्षा स्वत:ला चांगले मानीत असलेल्या इतर लोकांचे त्याने काय केले हे मला समजले.”

ईयोब 5:21

लोक त्यांच्या धारदार जिभेने तुझ्याबद्दल वाटेल ते बोलतील परंतु देव तुझे रक्षण करेल. जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा तुला घाबरुन जाण्याची गरज नाही.

स्तोत्रसंहिता 2:12

तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात. पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.

स्तोत्रसंहिता 10:2

गर्विष्ठ आणि दुष्ट लोक वाईट योजना आखतात. आणि गरीब लोकांना त्रास देतात.

स्तोत्रसंहिता 27:5

मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तंबूत लपवेल तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.

स्तोत्रसंहिता 32:7

देवा, तू माझी लपण्याची जागा आहेस. तू माझे माझ्या संकटांपासून रक्षण करतोस तू माझ्या भोवती कडे करतोस आणि माझे रक्षण करतोस म्हणून मी तू मला कसे वाचवलेस त्याचे गाणे गातो.

स्तोत्रसंहिता 36:6

परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस.

स्तोत्रसंहिता 36:8

परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.

स्तोत्रसंहिता 36:11

परमेश्वरा गर्विष्ठ लोकांना मला सापळ्यात अडकवू देऊ नकोस. वाईट लोकांना मला पकडू देऊ नकोस.

स्तोत्रसंहिता 40:4

जर एखाद्याचा परमेश्वरावर विश्वास असला तर तो माणूस खरोखरच सुखी होईल. जर तो राक्षसांकडे आणि चुकीच्या देवाकडे वळला नाहीतर तो खरोखरच सुखी होईल.

स्तोत्रसंहिता 57:11

देव स्वर्गापेक्षा खूप गौरवी आहे. त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे.

स्तोत्रसंहिता 64:2

माझे माझ्या शत्रूंच्या गुप्त योजनांपासून रक्षण कर. त्या दुष्ट लोकांपासून मला लपव.

स्तोत्रसंहिता 86:14

गर्विष्ठ लोक माझ्यावर हल्ला करतात. देवा, वाईट लोकांचा समूह मला ठार मारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ते लोक तुला मान देत नाहीत.

स्तोत्रसंहिता 91:1

तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.

स्तोत्रसंहिता 103:8

परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे. देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे.

स्तोत्रसंहिता 103:11

देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीव रजितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे.

स्तोत्रसंहिता 119:124

मी तुझा सेवक आहे. मला तुझे खरे प्रेम दाखव. मला तुझे नियम शिकव.

स्तोत्रसंहिता 124:5

गर्विष्ठ लोकांनी वर वर चढणाऱ्या पाण्याप्रमाणे आपल्या तोंडापर्यंत येऊन आपल्याला बुडवले असते.

स्तोत्रसंहिता 140:3

त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत. जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे.

स्तोत्रसंहिता 140:5

त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला. त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले. त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.

रोमकरांस 13:13

दिवसा आपण जसे काळजीपूर्वक वागतो, तसे वागूया. खादाडपणात, मद्यपानात, लैगिकतेत, स्वैरपणात, भांडणात, द्वेषात नको, 14तर त्याऐवजी येशू ख्रिस्ताला परिधान करा. आणि आपल्या पापी वासना मध्ये गुंतून राहू नका.

2 करिंथकरांस 12:20

कारण मला भय वाटते की, मी आल्यावर कदाचित जसे मी इच्छितो तसे तुम्ही मला आढळणार नाही. आणि जसे तुम्ही इच्छित नाही तसा असलेला मी तुम्हांस आढळेन. म्हणजे कदाचित भांडणे, मत्सर, राग, कलह, चहाड्या, कुजबूज रुसणे, अव्यवस्था ही दिसून येतील.

गलतीकरांस 5:20

मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी,मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद,

1 तीमथ्याला 6:4

तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्याला काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क

याकोब 3:5

त्याचप्रकारे जीभ ही शरीराचा लहानसा भाग आहे, पण ती मोठमोठ्या गोष्टी केल्याची बढाई मारते.फक्त विचार करा, कितीतरी मोठे जंगल लहानशा आगीन पेट घेते!

याकोब 3:14

पण जर तुमच्या ह्रदयात कटूरता, मत्सर व स्वार्थी उद्देश असतील तर तुम्ही तुमच्या शहाणपणाची फुशारकी मारू शकणार नाही. कारण तसे करणे म्हणजे खोटेपणाच्या आड सत्य लपविण्यासारखे आहे.

याकोब 4:6

पण देव आम्हांवर त्याहूनही मोठी कृपा करतो. त्यासाठीच पवित्र शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठाचा विरोध करतो, पण नम्र जनांवर तो दया करतो.”

Interlinear

Choose Theme