Home Bibles स्तोत्रसंहिता 27:3 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 27:3 · मराठी बायबल

परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही. युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही. का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे.

Cross references

1 शमुवेल 19:8

पुन्हा युध्द सुरु झाले आणि दावीद पलिष्ट्यांशी लढायला गेला. पलिष्ट्यांचा त्याने पराभव केला. त्यांनी पळ काढला.

1 शमुवेल 28:15

शमुवेल शौलला म्हणाला, “मला तू त्रास का दिलास? मला का उठवलेस?”शौल म्हणाला, “मी अडचणीत सापडलो आहे. पलिष्टी माझ्यावर हल्ला करायला आले आहेत. परमेश्वराने माझी साथ सोडली आहे. त्याच्याकडून मला प्रतिसाद मिळत नाही. स्वपन्न किंवा संदेष्टे यांच्यामार्फत मला उत्तरे मिळत नाहीत. म्हणून मी तुला बोलावले. मी काय करु ते तू सांग.”

2 राजे 6:15

अलीशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथघोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले.अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करायचे?”

2 इतिहास 20:15

यहजीएल म्हणाला, “राजा यहोशाफाट, तसेच यहूदा आणि यरुशलेममधील रहिवाश्यांनो, मी काय म्हणतो ते ऐका. परमेश्वराचा संदेश असा आहे. ‘एवढी मोठी सेना पाहून घाबरुन जाऊ नका किंवा काळजी करु नका. हे युध्द तुमचे नव्हे तर परमेश्वराचे युध्द आहे.

ईयोब 4:6

तू देवाची भक्ती करतोस. तुझा त्याच्यावर विश्वास आहे. तू चांगला माणूस आहेस आणि तीच तुझी आशा असू दे.

स्तोत्रसंहिता 3:6

माझ्याभोवती हजारो सैनिक असतील. परंतु मी या शत्रूंना घाबरणार नाही.

स्तोत्रसंहिता 3:7

परमेश्वरा जागा हो! देवा मला वाचव तू फार शक्तिशाली आहेस तू जरमाझ्या शत्रूंच्या थोबाडीत मारलीस तर त्यांचे सगळे दात पडतील.

स्तोत्रसंहिता 52:6

चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन. ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील. ते तुला हसतील.

स्तोत्रसंहिता 112:7

त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.

यशया 41:11

बघ! काही लोक तुझ्यावर रागावले आहेत. पण ते लज्जित होतील. तुझे शत्रू नाहीसे होतील व कायमचे निघून जातील.

यशया 54:16

“बघ! मी लोहार निर्मिला. तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो. मग तापलेल्या लोखंडापासून त्याला पाहिजे तसे हत्यार तो बनवितो. त्याचप्रमाणे मी ‘नाश’ करणारा घडविला आहे.

रोमकरांस 8:35

ख्रिस्ताच्या प्रेमापासून आपणांस कोण वेगळे करील? त्रास, कष्ट, छळ, भूक, नग्नता, संकटे किंवा तलवारीने वध हे वेगळे करतील काय?

2 करिंथकरांस 5:6

म्हणून आम्हांला नेहमीच विश्वास असतो आणि माहीत असते की, जोपर्यंत आम्ही या शरीरात राहत आहोत, तोपर्यंत आम्ही प्रभुपासून दूर आहोत.

फिलिप्पैकरांस 1:28

आणि जे तुम्हांला विरोध करतात त्यांना तुम्ही भ्याला नाहीत. तुमचे हे धैर्य त्याच्या नाशाचा पुरावा होईल. पण तुमच्या तारणाचा पुरावा होईल. आणि हे देवाकडून असेल.

1 पेत्र 3:14

जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका”

प्रकटीकरण 2:10

जेदु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरु नकोस. मी तुला सांगतो, तुम्हांपैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठीसैतानाकडून तुरुंगात टाकतील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मीतुम्हांला जीवनाचा मुगुट देईन.

प्रकटीकरण 12:7

मग स्वर्गात एक युद्ध झाले. मीखाएलआणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले. साप व त्याचे दूत हे सुद्धात्यांच्याशी लढले.

Interlinear

Choose Theme