Home Bibles स्तोत्रसंहिता 22:30 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 22:30 · मराठी बायबल

आणि भविष्यात आपले वंशज परमेश्वराची सेवा करतील. लोक त्याच्याविषयी सर्वकाळ सांगत राहातील.

Cross references

स्तोत्रसंहिता 14:5

त्या दुष्टांना गरीब माणसाच्या उपदेशाकडे लक्ष द्यायचे नव्हते. का? कारण तो गरीब माणूस देवावर अवलंबून होता. परंतु देव त्याच्या चांगल्या माणसांबरोबर असतो. म्हणून वाईट लोकांना भीती वाटण्याजोगे बरेच काही असते.

स्तोत्रसंहिता 24:6

ते चांगले लोक देवाचा मार्ग अवलंबतात. ते याकोबाच्या देवाकडे मदतीसाठी जातात.

स्तोत्रसंहिता 73:15

देवा, मला इतर लोकांशी याबद्दल बोलायची इच्छा होती. परंतु त्यामुळे तुझ्या माणसांचा विश्वासघात केल्यासारखे झाले असते हे मला माहीत होते.

स्तोत्रसंहिता 87:6

देव त्याच्या सर्व लोकांविषयीची यादी ठेवतो. प्रत्येकाचा जन्म कुठे झाला ते त्याला माहीत आहे.

स्तोत्रसंहिता 102:28

आज आम्ही तुझे सेवक आहोत. आमची मुले इथे राहातील आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”

यशया 53:10

परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वत:चा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील.

मत्तय 3:9

अणि ‘अब्राहाम माझा पिता आहे.’ अशी फुशारकी तुम्हांला मारता येईल असे समजू नका; मी तुम्हांस सांगतो की, देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो.

गलतीकरांस 3:26

कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वासठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात.

इब्री लोकांस 2:13

तो आणखी म्हणतो, “मी माझा विस्वास देवावर ठेवीन.” यशया 8:17आणि तो पुन्हा म्हणतो,“येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.” यशया 8:18

1 पेत्र 2:9

पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.

Interlinear

Choose Theme