Home Bibles स्तोत्रसंहिता 22:26 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 22:26 · मराठी बायबल

गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील. जे लोक परमेश्वराला शोधत आहे, त्यांनी त्याची स्तुती करावी. तुमचे ह्दय सदैव आनंदी राहो.

Cross references

लेवीय 7:11

“परमेश्वरासाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधि असा:

1 इतिहास 29:10

त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले. ते असे:“हे परमेश्वर, इस्राएलच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.

स्तोत्रसंहिता 40:10

परमेश्वरा, मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले. मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही. परमेश्वरा, मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. मी तुझा दयाळूपणा आणि तुझी निष्ठा सभेतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही.

स्तोत्रसंहिता 40:16

परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे. त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते.

स्तोत्रसंहिता 50:14

म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली. तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या.

स्तोत्रसंहिता 69:32

गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात. या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.

स्तोत्रसंहिता 105:3

परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.

स्तोत्रसंहिता 107:9

देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.

स्तोत्रसंहिता 116:14

मी परमेश्वराला कबूल केलेल्या गोष्टी देईन. आता मी त्याच्या लोकांसमोर जाईन.

स्तोत्रसंहिता 116:18

मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन. आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन.

यशया 25:6

त्या वेळेस, सर्वशक्तिमानपरमेश्वर, डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंची मद्य असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल.

यशया 65:13

तेव्हा, परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला, “माझ्या सेवकांना खायला मिळेल, पण तुम्ही पापी भुकेले राहाल. माझ्या सेवकांना पाणी मिळेल, पण तुम्ही तहानलेले राहाल. माझे सेवक सुखी होतील, पण तुम्ही लज्जित व्हाल.

योना 2:10

मग परमेश्वर माशाशी बोलला आणि माशाने उलटी करून योनालाकोरड्या भूमीवर टाकले.

योहान 4:14

परंतु मी जे पाणी देतो ते पाणी जो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. मी दिलेले पाणी त्याच्या अंतर्यामी जिवंत पाण्याच्या झऱ्यासारखे होईल. त्या पाण्यामुळे त्याला अनंतकाळचे जीवन मिळेल.”

योहान 6:48

मी जीवन देणारी भाकर आहे.

Interlinear

Choose Theme